शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जलसंपदा मंत्र्याच्या जिल्ह्यात लोकांना पाणी नाही - खासदार अशोक चव्हाण यांची टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 6:49 PM

रावेरची जागा सोडल्याबद्दल शरद पवार यांचे आभार

मुक्ताईनगर : डॉ. उल्हास पाटील हे नवसाचे उमेदवार असून रावेरची जागा ही राष्ट्रवादीची असताना  काँग्रेसला ही जागा सोडल्याबद्दल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे जाहीर आभार मानत रावेर लोकसभा व जळगाव लोकसभा मतदारसंघातून आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी कुºहा येथे आयोजित प्रचार सभेत केले. तसेच जलसंपदा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच लोकांना प्यायाला पाणी नाही, अशी टिकाही त्यांनी केली.याप्रसंगी ते म्हणाले की, पाच वर्षात शेतकरी हवालदिल झाला आहे. मराठवाड्यातच दोनशे शेतकऱ्यांनी चार महिन्यात आत्महत्या केल्या. तर पाच वर्षांत राज्यात पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विकासात अग्रेसर महाराष्ट्र राज्य आता आत्महत्येत अग्रेसर झाल्याचा दुर्दैवी प्रसंग महाराष्ट्राच्या जनतेवर आला आहे. सत्तेचा फायदा भाजपने पैसा कमावण्यासाठी घेतला व त्याच पैशांच्या बळावर परत सत्ता मिळवण्याचे कारस्थान केंद्र शासन करत आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी काँग्रेस योग्य असून राज्य सरकारने कर्जमाफी घोषित करुन दोन वर्ष झाली मात्र अद्यापही कुणाला कर्जमाफी मिळाली नाही. केवळ अभ्यास करणारे हे सरकार सर्वच क्षेत्रात नापास झाले आहे. गेल्या पाच वर्षात दोन कोटी युवकांचे रोजगार जाऊन त्यांना भजे तळण्याचे भाजप अध्यक्ष सांगतात. हाताला काम नाही, शेतीला दाम नाही असं यापूर्वी कधी घडले नाही म्हणून या सरकारला खाली खेचण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले. जनतेच्या मनातच भाजपसत्तेबद्दल राग असून त्याचे दर्शन मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान यात मतदारांनी घडवले आहे. बºयाच दिवसांनी रावेर लोकसभा मतदार संघात पंजा दिसला असून नवसाच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले. राज्यशासन राज्यातील दुष्काळाबाबत गंभीर नाही. साधा,मध्यम व गंभीर असे तीन प्रकारचे दुष्काळ राज्यशासन सांगत आहे. यापूर्वी अशा प्रकारची विभागणी कधीही झाली नाही. महाराष्ट्रल अधोगतीला नेणाºया या सरकारला लाज वाटत नाही काय ?अशा शब्दात त्यांनी घणाघाती आरोप केला. मुंबई हल्ल्यात शहीद झालेले महाराष्टÑ एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या बद्दल वाईट शब्द बोलणाºया साध्वीला भोपाळ मधून उमेदवारी देणाºया या पक्षाची मानसिकता काय हे लक्षात येते. साध्वी प्रज्ञा सिंग यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी देखील त्यांनी केली. सैनिक व सैनिकी कारवाईचा काँग्रेसने कधीही मतांसाठी उपयोग केला नाही मात्र पुलवामा, सर्जिकल स्ट्राईक यासारख्या मुद्द्यांवरून भाजप सरकार हे लाचार झाल्यासारखे वागत आहे. त्याचा निवडणुकीसाठी फायदा करून घेत आहे.देशात यापुढे भाजपाचे चुकून सरकार जर आले तर देशात हुकुमशाही येईल आणि कधीही मतदान होणार नाही. म्हणून विचारांची लढाई असून राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी तर शेतकºयांची होणारच आहे पण कर्ज चुकवल्याबद्दल कोणत्याही शेतकºयाला पोलीस केस सामोरे जाऊ देणार नाही असा कायदा काँग्रेस सरकार निवडून आल्यानंतर करणार आहे. शेतकºयांच्या गळ्यात लाभार्थी म्हणून पाट्या घालणाºया व आरोपी प्रमाणे त्यांचे फोटो काढणाºया या शासनाला हाकलून लावा असे आवाहन त्यांनी केले. सभेदरम्यान चौकीदार चोर है च्या घोषणा दिल्या जात होत्या.

टॅग्स :Politicsराजकारण