शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे लोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 2:31 PM

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘आरसा मनाचा’ या सदरात लिहिताहेत विलास भाऊलाल पाटील..

जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. तसं भारताला उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या लोकांचा देश म्हणावं असं मला वाटतं. या देशात प्रेम, आपुलकी सद्भावआणि नाती जपणारी माणसं मानवतेचं महन्मंगल स्तोम गाणारी माणसं, त्यासाठी आयुष्य पणाला लावणारी माणसं मूळातच कमी, पण त्यांन ापूजणारी, त्यांना नमस्कार करणारी माणसं मात्र खूपच कमी. याऊलट पद, पैसा, प्रतिष्ठा (खोटी का असेना) यानं मोठी असणारी माणसं आज समाजात नमस्कार पात्र झालेली आहेत. आजकाल ‘पदं’ कशी मिळवली जातात, पैसा कसा कमावला जातो या विषयी बोलण्याची, लिहिण्याची काहीच आवश्यकता नाही असं मला वाटतं. आपणा सर्वांना ते चांगलच माहित आहे. पूर्वी एखाद्या महनीय व्यक्तीमुळे एखाद्या पदाची प्रतिष्ठा वाढत असे मात्र आजकाल एखाद्या पदामुळे गुंडपुंडसुध्दा महनीय झालेले दिसत आहेत. अर्थात याला काही सन्मान्य अपवाद नक्कीच आहेत नाही असे नव्हे पण अगदीच नगण्या बोटावर मोजण्याइतके. बहुतांश मात्र पद आणि पैशानेच महनीय झालेले दिसत आहेत. स्पष्टीकरणासाठी एक छोटी गोष्ट सांगतो, ‘एकदा एका गावात एका महापुरुषाची जयंती होती. मिरवणूक काढावयाचे ठरले. पालखी सजवण्यात आली. ऐनवेळी पालखी ठेवण्यासाठी एक गाढवच तेवढे उपलब्ध झाले. मिरवणूक निघाली. लोक पालखीला हात घालत होते. नमस्कार करत होते. गाढवाला वाटल वाह ! लोक मला हार घालत आहेत. नमस्कार करत आहेत. गाढव चेकाळलं, त्याला वाटलं मी हे पालखीचं ओझं तरी का वहावं म्हणून पालखी फेकून दिली. पालखी फेकल्याबरोबर लोक चिडले. गाढवाला पाठीवर रट्टे हाणले. गाढव पळत सुटलं.’ गोष्टीप्रमाणे आज समाजातील अनेक गाढवं पदाच्या पालखीमुळे स्वत:ला मोठे समजायला लागले अ ाहेत आणि समाजातील दुसरी गाढवं सुध्दा त्यांना मोठी समजायला लागलेली आहेत आणि नमस्कार करायला लागली आहेत. वास्तविक उगवता सूर्य सुध्दा संध्याकाळी अस्ताला जातो. (चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा) आणि त्यावेळी कधी चंद्र, तारे, तारका आणि प्रसंगी मेणबत्ती किंवा काजवा देखील आपल्याला सक्षमपणे प्रकाश देतो हे आपण विसरतो आणि त्यांची हेळसांड करतो. त्याचप्रमाणे अस्ताला जाणारा सूर्य देखील दुसºया दिवशी नव्या उमेदीने उदयाला येतो हे त्रिकालाबाधीत सत्य आहे पण घुबडाच्या जातीच्या काही माणसांना खरा प्रकाश माहित नसतोच आणि काही फक्त पावलापुरता प्रकाश शोधत असतात. एक पाऊल ठेवण्यापुरती जागा आणि तेवढाच फक्त प्रकाश इतकी आत्मकेंद्री माणसं असतात आणि ती सत्ता-संपत्तीच्या प्रकाशात दीपून जातातआणि खºया योगत्येच्या माणसांना सोडून नकलींच्या मागे धावतात. त्यांनाच नमस्कार करण्यात स्वत:ला धन्य समजतात. पण त्या घुबडांना हे माहीत नसते की हा प्रकाश लुप्त झाल्यावर माझ्यासमोर अंधार पसरणार आहे आणि दुसरं पाऊल टाकण्याइतक दिसावं एवढा प्रकाश आणि तेवढी जागाही शिल्लक राहणार नाही अ ाणि प्रसंगी त्याचा कडेलोटही होऊ शकतो म्हणून मी अशा माणसांना निव्वळ आत्मकेंद्रीच नव्हे तर आत्मघातकी सुध्दा म्हणेल. कारण योग्य माणसाला नमस्कार न करून तुम्ही स्वत:चेच नुकसान करीत असतात. याऊलट खºया योग्यतेच्या माणसाला कुणाच्या नमस्काराची देखील गरज नसते. तो तर त्याचे काम क रीतच असतो. एखाद्या ‘दीपस्तंभा’प्रमाणे. दीपस्तंभ प्रकाश देतो, ज्याला तो प्रकाश देतो त्याच्याबद्दल त्याला काही देणघेण नसतं किंवा त्याला सातत्यानं विझवू पाहणाºया वाºयाचाही त्याला काही सोयरसुतक नसतं. तसच समाजात कोण आपल्याला दुर्लक्षित करत, हेटाळत किंवा त्रास देतं याच्याशी चांगल्या माणसाला काहीच देणं घेणं नसतं हेच खरं !-विलास भाऊलाल पाटील, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव