शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
4
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
5
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
6
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
7
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
8
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
9
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
10
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
11
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
12
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
13
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
14
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
15
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
16
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
17
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
18
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
19
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
20
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील

जळगाव मनपा निवडणूक : उद्योजक, गाळेधारक, हॉकर्सच्या प्रश्नांनी लोकप्रतिनिधी निरुत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:43 PM

रोटरी क्लब आॅफ जळगाव वेस्टतर्फे ‘माझं जळगाव- माझी भूमिका’वर चर्चा

ठळक मुद्दे तुमच्या राजकारणात शहरवासीयांना वेठीस का धरता? विविध प्रश्नांचा भाडीमार

जळगाव : सत्ता मिळविण्यासाठी विविध पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असतानाच ‘तुमच्या राजकारणात शहरवासीयांना वेठीस का धरले जात आहे’?, असा सवाल उपस्थित करीत उद्योजक, गाळेधारक, हॉकर्स व सर्वसामान्यांनी प्रश्नांचा भाडीमार करीत लोकप्रतिनिधींना निरुत्तर केले. या वेळी एका गाळेधारकास आपला प्रश्न मांडत असताना अश्रू रोखता आले नाही.मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब आॅफ जळगाव वेस्टच्यावतीने मायादेवीनगरातील रोटरीभवन येथे गुरुवारी ‘माझं जळगाव- माझी भूमिका’ विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी हा प्रकार घडला. या चर्चासत्रास भाजपातर्फे आमदार सुरेश भोळे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी मंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेतर्फे माजी महापौर नितीन लढ्ढा व काँग्रेसतर्फे डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह क्लबच्या अध्यक्षा संगीता पाटील, सचिव राजेश परदेशी, परिसंवाद प्रमुख गनी मेमन उपस्थित होते.विविध प्रश्नांचा भाडीमारचर्चासत्राच्या सुरुवातीला प्रत्येक लोकप्रतिनिधी आपली भूमिका मांडण्यासह एकमेकांवर आरोप केले. आरोप-प्रत्यारोपाच्या या फैरी वाढू लागल्याने आपण काय करणार आहेत, ते मांडण्याबाबत सांगण्यात आले तरीदेखील एकमेकांवरील आरोप सुरूच असल्याने उपस्थित उद्योजक, गाळेधारक, हॉकर्स, सामान्य जनता यांनी लोकप्रतिनिधींना रोखत विविध प्रश्नांचा भाडीमार सुरू केला.अन् गाळेधारकास रडू कोसळलेलोकप्रतिनिधींनी गाळ््यांबाबतची भूमिका मांडल्यानंतर त्यावर आपले म्हणणे मांडण्यासाठी विनोद जवाहराणी हे उभे राहिले. गाळ्यांचा लिलाव करून तुम्ही आम्हाला बाहेर काढणार का, आम्ही शहरात राहयचे की नाही, असा सवाल उपस्थित केला. त्यावेळी त्यांना अश्रू रोखता आले नाही. त्यावर नितीन लढ्ढा यांनी, आताही भाजपाकडून आपली दिशाभूल केली जात असल्याचे नमूद केले.उद्योगांची अधोगती का?उद्योजक किरण राणे यांनी औद्योगिक वसाहतीच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करीत ‘मनपा औद्योगिक वसाहतीचा विकास करू शकत नाही’, असा ठराव करणे योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला. त्या वेळी सर्व लोकप्रतिनिधींनी औद्योगिक वसाहतीचा विकास करून बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.‘हॉकर्स’ला देशोधडीला का लावले?या वेळी होनाजी चव्हाण यांनी हॉकर्सचा प्रश्न उपस्थित करून केंद्र सरकारचे फेरीवाला धोरण का राबविले नाही, हॉकर्सला हटवून वाळू वाहतुकीसाठी हा रस्ता मोकळा केला का? असा सवाल उपस्थित केला. फेरीवाला धोरणाचा ठराव केला तो राबविणे प्रशासनाचे काम असल्याचे नितीन लढ्ढा यांनी सांगितले. याविषयावर बरीच खडाजंगी होऊन सात हजार जणांना देशोधडीला लावल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.पदाधिकाऱ्यांना जनतेने धरले रोखूनउद्योजक, गाळेधारक, हॉकर्स यांच्या पाठोपाठ सामान्यांनीदेखील प्रश्न उपस्थित करणे सुरू केले. या दरम्यान बैठकीला जायचे असल्याचे नितीन लढ्ढा सांगत होते व इतरही लोकप्रतिनिधी जाण्याच्या तयारीत होते. मात्र तुम्ही जाऊ शकत नाही, अशा सूचना उपस्थितांमधून येऊ लागल्या. त्यावर नितीन लढ्ढा यांनी मी तुमचा बांधील नाही, असे उत्तर दिले. त्यानंतर व्यासपीठाच्या खाली एका जणासोबत त्यांची जोरदार चर्चा झाली. त्या दरम्यान गुलाबराव देवकर हे दुसºया दरवाज्याने निघून गेले. त्या नंतर नितीन लढ्ढा हेदेखील निघाले. दुसरीकडे आमदार सुरेश भाळे यांच्या कानात येऊन त्यांचे कार्यकर्ते काही सांगत होते व तेदेखील उभे राहिले. मात्र उपस्थितांचा संताप पाहता आमदार भोळे व डॉ. राधेश्याम चौधरी पुन्हा खुर्चीवर बसले.नगरसेवकांच्या मालमत्ता सील कराशहरवासीय नियमित कर भरत असले तरी त्यांना वेठीस धरले जाते. सुविधा मिळत नसल्याने कर्ज फेड व इतर प्रश्न मार्गी लावत शहराच्या विकासासाठी नगरसेवकांच्या मालमत्ता सील करा, असाही मुद्दा शहरवासीयांनी या वेळी उपस्थित केला.गाळेधारक-हॉकर्स यांचा परिसंवाद घेणारगाळेधारक व हॉकर्स यांच्या प्रश्नांचे गांभीर्य पाहता त्या संदर्भात रोटरी क्बल आॅफ जळगाव वेस्टतर्फे परिसंवाद आयोजित करण्यात येईल, असे गनी मेमन यांनी घोषित केले. या वेळी तणाव वाढत असताना मेमन यांनी उपस्थितांची समजूत काढत सर्वांना शांत केले.पक्षांची भूमिकाआपल्या पक्षांची भूमिका मांडताना उपस्थितांनी कोणते आरोप केले व निवडणुकीनंतर काय करणार, हे त्यांच्याच शब्दात...काँग्रेस : रस्ते, साफसफाई, शाळा, दवाखाने, यांच्या गंभीर समस्या असून उद्याने बकाल झाल्याचा आरोप डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केला. भाजप-सेना एकाच नाण्याच्या दोन बाजू असून भाजपाने सत्ता असतानाही शहरवासीयांना वेठीस धरल्याचाही आरोप केला. या पक्षांच्या नेत्यांनी अवैध धंदेवाल्यांना जवळ करीत राजकारणात गुन्हेगारीचे उदात्तीकरणाचे काम केल्याचा आरोपही डॉ. चौधरी यांनी केले. काँग्रेस आघाडीची सत्ता आल्यास कोणाकडेही हात न पसरविता आपण कर्ज फेड करू, शहरात रस्ते, स्वच्छता करण्यासह नगरसेवक ठेका घेणार नाही, नातेवाईकांना नोकरी देणार नाही, उद्योगासाठी पूरक वातावरण तयार करू अशी ग्वाही त्यांनी दिली.राष्ट्रवादी काँग्रेसभाजप-सेना एकमेकांवर आरोप करीत असून ते एकमेकांचे पाय ओढत आहे. त्यामुळे ते कसे विकास करू शकतील, असा सवाल गुलाबराव देवकर यांनी उपस्थित केला. राज्यात सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी केवळ मनपात सत्ता नसल्याने काही करीत नसल्याचा उल्लेखही देवकर यांनी केला. आपले शहर म्हणून काम करण्याची भावना ठेवल्यास काम करता येऊ शकते, असा दावा करीत त्यांनी आपण पालकमंत्री असताना शहरासाठी केलेल्या कामांचा उल्लेख केला. आघाडीची सत्ता आल्यास शहराचा चेहरा मोहरा बदलवू. परिवर्तन केल्या शिवाय राहणार नाही, असे सांगत कामे केले नाही तर प्रभागात फिरु देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.या वेळी देवकर व डॉ. राधेश्याम चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या २५ कोटींच्या निधीचा उल्लेख करीत तो खर्च झाला नाही तर आता २०० कोटी मिळण्यास किती वर्ष लागतील आणि शहराच्या विकासासाठी सत्ता मिळण्याचाच हट्ट भाजपाकडून का केला जात आहे, असा सवालही या वेळी उपस्थित करण्यात आला.भाजपा : सत्ता कोणाची येईल हे काळ ठरवेल, असा उल्लेख आमदार सुरेश भोळे यांनी सुरुवातीलाच केला. २५ कोटींच्या निधी बाबत बोलताना ते म्हणाले मनपाच सर्वांशी चर्चा केली. मात्र कामे ठरविताना आपल्याला सांगितले नाही व भाजपा नगरसेवकांच्या प्रभात कमी निधी दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यामुळे या निधीच्या खर्चास फाटे फुटल्याचे ते म्हणाले. आमदार म्हणून आपण शहरात काय-काय केले त्याचा उल्लेखही त्यांनी केला. यावेळी बोलताना ते प्रत्येक वेळी नितीन लढ्ढा साक्षीदार असल्याचा उल्लेख करीत होते. सत्तेच्या हट्टाबाबत बोलताना ते म्हणाले की, राजकारणाची गणिते वेगळी असतात, त्यासाठी सत्ता मिळणे आवश्यक असते. रोटरीने एखादे काम केले तर त्यावर रोटरीचे नाव टाकले जाते, असे उदाहरण त्यांनी या वेळी दिले. शहराला सिंगापूर करू असे म्हणत नाही, मात्र शहरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊ असेही भोळे म्हणाले.विधानसभेला मत मागणार नाहीया वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे न आल्याने त्यांची चित्रफीत दाखविण्यात आली. त्यात त्यांनी सांगितले की, तांत्रिक अडचणीमुळे येथे विकास होऊ शकला नाही. मनपात सत्ता मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत शहराचा चेहरा मोहरा बदलवू तसे न झाल्यास विधानसभेला मत मागणार नाही, अशी ग्वाही दिली.शिवसेना२००० सालापर्यंत मनपात सर्व सुरळीत सुरू होते. मात्र २००१मध्ये सत्ता बदलली व २१ महिन्याच्या काळात ग्रहण लागल्याचे नितीन लढ्ढा यांनी सांगितले. तत्पूर्वी मनपाच्यावतीने करण्यात आलेल्या कामांचा उल्लेख त्यांनी केला. या वेळी त्यांनी २५ कोटी खर्चात आलेल्या अडचणी, गाळेप्रश्न यात काय काय समस्या आल्या त्याचा उल्लेख त्यांनी केला.एकमेकांना चिमटेडॉ. राधेश्याम चौधरी हे कागदपत्रे जमा करण्यात तरबेज असून त्यांनी बदनामी करण्याची सुपारी घेतली असल्याचे आमदार भोळे म्हणाले. त्यावर डॉ. चौधरी यांनी सुपारी मी नाही, तुम्ही घेतली असून तीदेखील दारू दुकानांसाठी घेतल्याचा उल्लेख केला.सहा रस्ते तत्काळ वर्ग करू शकतात, इतके पॉवरफूल आपले आमदार असल्याचा चिमटाही त्यांनी काढला. त्यानंतर हो आमचा दारुचा व्यवसाय आहे, मात्र तो अवैध नसून त्याचा परवाना आहे, असे उत्तर आमदार भोळे यांनी दिले.नितीन लढ्ढा यांनी निधी आणण्याच्या मुद्यावर आमचा पक्ष राज्यात सत्तेत भागीदार आहे, आम्हीही निधी आणू शकतो, नाही तर पाहू, असे सांगितले. त्यावर पाठिंबा काढून घ्या, असा सल्ला गुलाबराव देवकर यांनी दिला. त्यामुळे चर्चासत्रादरम्यान उपस्थितांचे बराचवेळी मनोरंजनदेखील झाले.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव