जळगाव :शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोर कर्नाटक सरकारचा निषेध म्हणून विना परवानगी आंदोलन करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना तसेच किसान मुक्ती आंदोलनप्रकरणी लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांना जिल्हा पेठ पोलिसांनी अटक करुन लागलीच सुटका केली. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या.अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे जळगाव, धुळे, नंदुरबारसह गुजरात राज्यात ७०० गावांमध्ये किसान मुक्ती आंदोलन करण्यात आले. जळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आदिवासी बांधवांनी नृत्य करुन लक्ष वेधले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघन म्हणून पोलिसांनी आंदोलन करणाºया लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, लोटू सपकाळे, उमाकांत वाणी, अमोल कोल्हे, विनोद देशमुख, भारत ससाणे, सचिन धांडे, प्रमोद पाटील, किरण वाघ, सुमीत साळुंखे, अनिल सपकाळे यांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच मुबंई पोलीस अॅक्ट कलम ६८ नुसार त्यांना ताब्यात घेवून कलम ६९ नुसार त्यांची सुटका करण्यात आली होती. जळगाव तालुका तसेच महानगर शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येवून घोषणाबाजी करण्यात आली होती. शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे, दिनेश जगताप, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, सभापती नंदलाल पाटील, डॉ. कमलाकर पाटील, जनार्दन कोळी, ईश्वर राजपूत, माजी महानगर प्रमुख प्रकाश बेदमुथा यांना ताब्यात घेवून लगेच सुटका करण्यात आली.विना परवानगी आंदोलन; शिवसैनिकांवर गुन्हाजळगाव : कर्नाटक येथील भाजपा सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवून शिवरायांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ महानगरपालिकेसमोर विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेनेच्या १६ ते १८ कार्यकर्त्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ९ आॅगस्ट रोजी शिवसेनेने मनपासमोर कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे, दिनेश जगताप, गणेश गायकवाड, ईश्वर राजपूत, जाकीर पठाण, नितीन सपके, हेमंत महाजन, पूनम राजपूत, ज्योती शिवदे, सारीका माळी यांच्यासह ८ ते १० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकसंघर्ष, सेना कार्यकर्त्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 1:10 PM