तालुक्यात कुटीर रुग्णालयासह चार प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुरू आहे, तसेच लहान मोठ्या गावांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. नियमित लसीकरण नसल्याने लसीकरणाचा टक्का कमी झाल्याचे दिसून येते. लसीकरण फक्त आठवड्यातून दोन-तीन दिवसच सुरू असते, यामुळे लसीकरण कमी होत आहे. वरिष्ठ पातळीवरून लसींचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. लसींचा साठा उपलब्ध झाल्यास या कामाला गती मिळू शकते. सध्या केवळ १०० ते १२५ लसींचा डोस येत असतात.
२६ जुलैपर्यंत झालेले लसीकरण
आरोग्य केंद्राचे नाव झालेले लसीकरण
मंगरूळ ४,१९२
शेळावे ४,६३९
शिरसोदे ५,६९७
तामसवाडी ४,८३३
पारोळा ११,८५०
एकूण झालेले लसीकरण---------------
३१,२११
पुरवठा होतोय कमी
जिल्हा स्तरावरून नियमितपणे व मोठ्या प्रमाणात लसींचा डोस उपलब्ध करून दिला जात नसल्याने, लसीकरणाच्या केंद्रावरून नागरिक जर लसीकरण सुरू झाल्यास, मोठमोठ्या रांगा सकाळी ६ वाजल्यापासून लोक लावत असतात. कोणी बूट चप्पल ठेवून आपले नंबर रांगेत आरक्षित करून ठेवतात. काही ठिकाणी जर लस नसल्यास रिकाम्या हाती लोकांना घरी परतावे लागते.
दररोज लसींचा साठा जर जिल्हा रुग्णालयातून उपलब्ध करून दिल्यास सर्वांना लस वेळेवर घेता येईल, गर्दी होणार नाही व लसीकरणाचा टक्काही वाढेल, एवढे मात्र निश्चित.
------लसीकरण केंद्रावर लसीकरण नियमित----
ज्या दिवशी लसींचा साठा उपलब्ध होतो. त्या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नियमित सर्वांना लसीकरण हे केले जाते. जी व्यक्ती केंद्रावर लस घेण्यासाठी येत असेल, त्याला लसीकरण केल्याशिवाय परत केले जात नाही. ज्या दिवशी जेवढे डोस लसीकरणाचे ठरवून दिले जातात, त्या दिवशी उपलब्ध डोस संख्येनुसार दिले जातात.
- राखी बडगुजर, परिचारिका कुटीर रुग्णालय पारोळा
---
२७सीडीजे १