जळगाव : जगातील सगळ्या कल्पना या खालच्या पातळीवरून आलेल्या आहेत. त्यामुळे खालच्या पातळीवर काम करणारा माणूस खूपच महत्वाचा आहे, हे लक्षात येईल. कागदाला टाचणी कशी लावायची, हे मी शिपायाकडून शिकलो, असे प्रतिपादन सुप्रसिध्द वक्ते जयप्रकाश काबरा (ठाणे) यांनी केले.रोटरी परिवारातील ज्येष्ठ सदस्य व उद्योजक डॉ. किशन काबरा यांच्या इमोशनल ग्रोथ यांच्या पुस्तकाच्या व्दितीय आवृत्तीचे तसेच अशोक जोशी अनुवादीत ‘स्वर्ग हवाय कुणाला?’ पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. कांताई सभागृहात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. ते म्हणाले की, प्रकाश आमटे यांच्याशी माझा जवळचा संबंध आला. त्यांच्या येथे गेल्यावर कळले की, तेथील रोग्यांनी ज्यांना जगानं एका बाजूला सारलं होतं, त्यांनी ७०० ग्रॅमचा गुलाब फुलवला, त्यांनीच ७ किलोचे वांगे बनवले. म्हणजे कोणतीही कल्पना ज्यांना आपण खालच्या पातळीवरचे म्हणतो, पण त्यांनीच जगाला केवढ्या मोठ्या गोष्टी दिल्यात हे ऐकलं, पाहिलं तर आश्चर्य वाटेल, असे ते म्हणाले.यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक (धुळे) हेही उपस्थित होते. सूत्रसंचालन गिरीष कुलकर्णी यांनी केले. लेखक डॉ. किशन काबरा यांनी आपल्या मनोगतात जीवनाला समजायचे असल्यास मागे वळून पहा व जीवन जगायचे असल्यास भविष्याचा वेध घ्या. अनुवादक अशोक जोशी यांनी मनोगतात डॉ. किशन काबरानं समजण्याची संधी पुस्तकातून मला मिळाली. व्यवस्थापिका सुजाता बोरकर यांनी परिचय करुन दिला तर सपना काबरा यांनी आभार व्यक्त केले. गिरीश कुळकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.कार्यक्रमास माजी महापौर रमेशदादा जैन, संजय बिर्ला, माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष अॅड. नारायण लाठी, कॅप्टन मोहन कुळकर्णी, डॉ. प्रदीप जोशी, डॉ. प्रीती अग्रवाल, डॉ. शिल्पा बेंडाळे, सुशील नवल, अॅड. प्रवीण जंगले, नितीन रेदासनी, अनिल कांकरिया आदी उपस्थितहोते.
खालच्या पातळीवर काम करणारा माणूस महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 5:44 PM