लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : लग्नाचे आमिष दाखवून २४ वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाºया परवेज शेख रईस शेख याने आणखी अनेक मुलींना फसविल्याचा संशय आहे, त्यामुळे त्याची चौकशी अपूर्ण आहे तसेच त्याचा फौजदार पिता पोलिसांना अद्याप सापडलेला नसल्याने सरकार पक्ष व पीडित मुलीच्या वकिलांनी न्यायालयात प्रभावी बाजू मांडल्याने परवेजच्या कोठडीत आणखी दोन दिवसाची वाढ करण्यात आली.परवेज शेख याने शहरातील एका २४ वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून सतत पाच वर्ष बलात्कार केला तर त्याचा फौजदार पिता रईस शेख याने पीडित तरुणीला धमकी देत तिच्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला पिता-पुत्राविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर सायंकाळी परवेज शेख याला अटक करण्यात आली होती. न्या.प्रतिभा पाटील यांनी त्याला ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत संपल्याने गुरुवारी त्याला न्या.के.एस.कुळकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनीही मांडले प्रभावी मुद्देपोलीस उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख यांनी परवेजला न्या.के.एस.कुळकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले. परवेज याने पीडित तरुणीसह आणखी काही मुलींना फसविल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने तपास करावयाचा आहे.तसेच त्याच्या दोन साथीदारांचीही चौकशी करणे बाकी आहे. त्यांच्याबाबतची माहिती परवेजकडूनच मिळू शकते. त्याचा पिता रईस शेख याला अटक झालेली नाही असे देशमुख यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर पीडित तरुणीचे वकील पंकज अत्रे यांनीही पोलिसांच्याच मुद्याचा आधार घेत परवेजला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. बचाव पक्षाचे वकील सागर चित्रे यांनी परवेजच्या पोलीस कोठडीची गरज नाही. त्याची वैद्यकीय तपासणी झालेली आहे.त्याच्या पित्याने खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याचे सांगून कोठडीच्या मागणीला विरोध केला. न्यायालयाने दोन्हीकडील युक्तीवाद व पोलिसांचे म्हणणे ऐकून परवेजच्या पोलीस कोठडीत ८ जुलैपर्यंत वाढ केली.
परवेजने अनेक मुलींना फसविल्याचा संशय
By admin | Published: July 07, 2017 2:04 AM