पेठ ग्रामपंचायत हद्दीतील औरंगाबाद महामार्गावर रस्ता दुभाजकाचे काम सुरू आहे. पहूर पेठ गावाचा अंतर्गत रस्ता औरंगाबाद व पाचारो रस्त्याला जोडणारा आहे. या रस्त्याला पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, लेलेनगर, संतोषीमाता नगर व लेले विद्यालय, महावीर पब्लिक स्कूल यांचा संपर्क आहे. दुभाजकामुळे रस्ता बंद झाल्याने नागरिक, विद्यार्थी, महिला वर्ग यांची गैरसोय होत आहे. या दुभाजकाच्या मध्ये दहामीटरचे अंतर सोडून दोन्ही बाजूंनी काम करावे, अशा आशयाचे निवेदन सरपंच नीता रामेश्वर पाटील यांच्या स्वाक्षरीचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना देण्यात आले. यावेळी पितांबर कलाल, डायमंड टेलर, शांताराम गोंधनखेडे,रामभाऊ मारकड उपस्थित होते. यासोबतच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग व सहायक पोलीस निरीक्षक पहूर यांनाही निवेदन देण्यात आली. यासंदर्भात पोलीस अधीक्षक मुंडे यांनी पहूर पोलीस स्टेशनला वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्याचे आदेश सोमवारी दिले. त्यानुसार तातडीने साहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल नाईक, पोलीस कर्मचारी जितेंद्र परदेशी, ईश्वर देशमुख यांनी औरंगाबाद महामार्गावरील दुभाजकाची पाहणी केली. यावेळी उपसरपंच श्यामराव सावळे, सतीश लोढा, दिलीप बेदमुथा, शरद बेलपत्रे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
कॅप्शन- औरंगाबाद महामार्गावर रस्ता दुभाजकाची पाहणी करताना स्वप्निल नाईक. सोबत पदाधिकारी.