जळगाव : गोलाणी मार्केटमधील (वल्लभदास वालजी संकुल) गाळे व्यापाऱ्यांना दीर्घ मुदतीने कराराने देणे बेकायदेशीर असून तसा शासनाकडे विखंडनासाठी पाठविलेल्या ठरावाविरुद्ध सुरेशदादा टॉवर व वाणिज्य व्यापारी असोशिएनतर्फे नगररचना विभागाकडे याचिका दाखल करुन हरकत घेतली असल्याची माहिती ए.जे. पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी दिली.या संदर्भात शनिवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कासट, सचिव रामजी सुर्यवंशी, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी उपस्थित होते. यावेळी पदाधिकाºयांनी सांगितले की, महापालिकेचे तत्कालीन प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे मनपा आयुक्तपदाचा पदभार असताना त्यांनी मार्केटमध्ये स्वच्छता होत नसल्याचा ठपका ठेवून कलम १३३ अन्वये मार्केट बंद केले होते. त्यानतंर असोसिएशनची चर्चा केल्यानतंर पालिकेला ३ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर स्वच्छतेसाठी प्रती व्यापारी ११०० रुपये जमा करण्यात आले. मात्र, हे स्वच्छतेचे काम केवळ २ महिनेच करण्यात आले. त्यानंतर जमा रकमेचा हिशोबदेखील दिला नसल्याचा आरोप व्यापाºयांनी पत्रकार परिषदेत केला.या सोबतच निंबाळकर यांनी २०१७मध्ये मनपा मालकिच्या गोलाणी मार्केटमधील गाळे कायद्यानुसार तीन वर्षांपेक्षा जास्त काळ भाड्याने देणे बेकायदेशीर असल्याचे सांगत व्यापाºयांना ५० वर्षासाठी भाड्याने दिलेल्या गाळे कराराचे ठराव विखंडनासाठी शासनाकडे पाठविले. यात शासनाकडून २०१८मध्ये मनपा प्रशासनाला अधिकची माहिती मागितली. त्यावेळी निंबाळकर यांनी व्यापारी मार्केटची स्वच्छतादेखील करीत नसल्याची माहिती पाठविली. या विखंडनाच्या प्रस्तावावर गोलाणी मार्केट असोसिएशनने नगरविकास मंत्रालयात हरकत घेणारी याचिका दाखल केली असल्याची माहिती दिली. हे मार्केट पालिकेने बिओटी तत्वावर बांधले असल्याने त्यास तीन वर्षेच कराराने देण्याचा नियम लागू होत नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
जळगवातील गोलाणी मार्केट गाळे करारासंदर्भात विखंडनासाठी पाठविलेल्या छरावाविरुद्ध याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:16 PM