जळगाव : निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेली माहिती लपविल्याच्या कारणावरून भाजपाच्या विद्यमान चार नगरसेवकांविरोधात जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर कामकाजही झाले असून चारही नगरसेवकांनी आपला खुलासा सादर करण्याबाबत १५ दिवसांची मुदत न्यायालयाकडे मागितली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.आॅगस्ट महिन्यात मनपाची निवडणूक झाली. निकाल जाहीर झाल्यानंतर या संदर्भात काही तक्रारीबाबत निवडणूक याचिका दाखल करण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली होती. या दहा दिवसाच्या मुदतीत शिवसेनेच्या चार पराभूत उमेदवारांनी त्यांच्या विरोधातील चार उमेदवारांविरोधात याचिका दाखल केली आहे. यामध्ये प्रभाग ६ ब च्या शिवसेनेच्या उमेदवार वर्षा खडके यांनी भाजपाच्या विद्यमान नगरसेविका मंगला चौधरी यांच्या विरोधात, तर प्रभाग १० ड चे नगरसेवक कुलभुषण पाटील यांच्या विरोधात सेनेचे उमेदवार रविंद्र सोनवणे यांनी याचिका दाखल केली आहे. तर प्रभाग ८ ड चे नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील यांच्या विरोधात निलेश पाटील यांनी तर प्रभाग ८ ब च्याच नगरसेविका लता भोईटे यांच्या विरोधात कल्पना पाटील यांनी याचिका दाखल केली आहे.सेनेच्या नऊ नगरसेवकांविरुद्धही विभागीय आयुक्तांकडे तक्रारखाविआच्या सदस्यत्वाचा राजीनामा न देताच शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या सेनेच्या नऊ विद्यमान नगरसेवकांविरुद्ध भाजपाचे सुनील माळी, अनिल पगारिया व जहाआरा पठाण यांनी नाशिक येथे विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.मंगला चौधरींचा अपात्रतेचा कार्यकाळ संपला नसल्याची तक्रारभाजपाच्या विद्यमान नगरसेविका मंगला चौधरी या मनपाच्या २०१३ च्या कार्यकाळात मनसेच्या नगरसेविका असताना, पक्षादेश न मानल्यामुळे त्यांना २२ जुलै २०१६ रोजी विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरविले होते. दरम्यान, त्यांचा अपात्रतेचा कार्यकाळ संपला नसताना देखील त्यांनी मनपा निवडणूक लढविली असल्याचे कारण देत वर्षा खडके यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर नुकतेच कामकाजही झाले. आता ३० आॅक्टोबर रोजी या प्रकरणी सुनावणी होणार असल्याची माहिती याचिकाकर्त्यां वर्षा खडके यांनी दिली.या आहेत तक्रारी...प्रभाग ८ ड चे सेनेचे उमेदवार नीलेश पाटील यांनी भाजपाचे नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेत काही आरोप केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, डॉ. पाटील यांनी मनपा निवडणुकीच्या आधी सहा महिन्यांपूर्वी धरणगाव तालुक्यातील सतखेडा ग्रा.पं.निवडणुकीत देखील मतदान केले असल्याचे म्हटले आहे.प्रभाग १० ड मधील नगरसेवक कुलभुषण पाटील यांनी निवडणुकीचा अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात गुन्ह्याची माहिती लपविली असल्याची तक्रार रविंद्र सोनवणे यांनी केली आहे. तर प्रभाग ८ ब च्या नगरसेविका लता भोईटे यांनी आपल्याकडील थकीत मालमत्ता कराची रक्कम भरली नसल्याची तक्रार कल्पना पाटील यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेव्दारे केली आहे. या चारही प्रकरणात खुलासा सादर करण्याबाबत नगरसेवकांनी १५ दिवसांची मुदत मागितली आहे.
जळगाव महापालिकेच्या भाजपाच्या चार नगरसेवकांविरोधात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 1:01 PM
प्रतिज्ञा पत्रात माहिती लपविल्याचा आरोप
ठळक मुद्देखुलासा सादर करण्यासाठी मागितली मुदतथकीत मालमत्ता कराची रक्कम भरली नसल्याची तक्रार