ठळक मुद्दे५४ पदे भरण्याची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोपग.स.सोसायटीचा वार्षिक व्यवहार ८१२ कोटीसंस्थेत केवळ २१७ पदांची आवश्यकता. मात्र ३५२ कर्मचारी कार्यरत
चाळीसगाव- जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सह.पतपेढी (ग.स.पतपेढी,जळगाव) या संस्थेने ५४ पदे भरण्या संदर्भात केलेली प्रक्रीया बेकायदेशीर आहे. ही बाब सभासदांच्या दृष्टीने अहिताची आहे. या नोकर भरती व गैरकारभाराबाबत. जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष रावसाहेब मांगो पाटील व सरचिटणीस योगेश जगन्नाथ सनेर यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.संस्थेचा वार्षिक व्यवसाय ८१२.०६ कोटीचा आहे. परिपत्रकानुसान संस्थेत २१७ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात मात्र ३५२ कर्मचारी कार्यरत आहे. या बेकायदेशीर भरती प्रक्रिया व कारभारासंदर्भात १० रोजी औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केल्याची माहिती रावसाहेब पाटील यांनी दिली.