जळगाव : तत्कालीन नगरपालिका आणि जिल्हा बॅँकेशी संबंधित गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या पाच गुन्ह्यांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) फेरचौकशीस विरोध करणा-या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावल्या. आता या गुन्ह्याच्या फेरचौकशी व एसआयटी स्थापन होणार आहे.जळगाव पालिकेने राबविलेल्या वाघूर पाणीयोजना, विमानतळ विकास प्रकल्प, जिल्हा बँकेच्या आयबीपी योजना, पालिका आणि महावीर पतसंस्थेला दिलेले कर्ज या पाच गुन्ह्यांच्या तपासावर असमाधान व्यक्त करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.टी.व्ही. नलावडे व न्या.मंगेश पाटील यांच्या पीठाने या गुन्ह्यांचा फेरतपास करण्यासाठी तीन आठवड्यात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश ३ मे रोजी दिले होते.कोगटा व ओसवाल यांनी दिले होते आव्हानपाच गुन्ह्यांचा याआधी तपास झालेला असून तो योग्य झालेला आहे. एसआयटी स्थापन करुन फेरचौकशी करण्याची काहीही गरज नाही. खंडपीठाने चुकीचे आदेश दिलेले आहेत. ते रद्द करावे यासाठी राधेश्याम उर्फ श्याम मदनलाल कोगटा व ईसीपी हाऊसिंग इंडिया प्रा.लि. या कंपनीतर्फे व्यवस्थापक गिरधारीलाल ओसवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र दोन याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर शुक्रवारी न्यायमूर्ती आर.बानुमती व न्यायमूर्ती सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठाने पहिलीच सुनावली झाली. खंडपीठाचे आदेश कायम ठेवून ओसवाल व कोगटा यांच्या याचिक न्यायालयाने फेटाळून लावल्या. अॅड.सिध्दार्थ लुथरा, अॅड.संदीप सुधाकर देशमुख व अॅड.वसीम सिध्दीकी यांच्या माध्यमातून या याचिका दाखल झाल्या होत्या.
‘एसआयटी’च्या चौकशीस विरोध करणारी याचिका फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 4:56 PM
तत्कालीन नगरपालिका आणि जिल्हा बॅँकेशी संबंधित गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या पाच गुन्ह्यांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) फेरचौकशीस विरोध करणा-या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावल्या. आता या गुन्ह्याच्या फेरचौकशी व एसआयटी स्थापन होणार आहे.
ठळक मुद्देजळगावातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात कामकाज ‘त्या’ पाच गुन्ह्यांची फेरचौकशी होणार