आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१ : पेट्रोल पंपाच्या मापात पाप असल्याच्या संशयावरुन ग्राहकाने केलेल्या तक्रारीची दखल घेत वैध मापन शास्त्र विभागाच्या अधिका-यांनी सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता गणेश कॉलनी रस्त्यावरील पलोट सर्वो इंटरप्रायझेस या पेट्रोल पंपाची तपासणी केली. या तपासणीत नियबाह्य काहीही आढळून आले नसल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे तर या अधिका-याच्या कार्यपध्दतीवर शंका असल्याने नाशिक आयुक्तांकडे तक्रार करण्याची भूमिका तक्रारदाराने घेतली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मनोज वाणी (रा.गणेश कॉलनी, जळगाव) हे रविवारी दुपारी दोन वाजता पलोट सर्वो इंटरप्रायझेस या पेट्रोल पंपावरुन कारमध्ये डिझेल भरण्यासाठी गेले. पंपावरील कर्मचाºयाला डिझेल टाकी पुर्ण भरण्याचे सांगितले, त्यानुसार संंबंधित कर्मचाºयाने टाकी पुर्ण भरली. त्यात ८२ लीटर डिझेल भरल्याचा दावा कर्मचाºयाने केला. या दाव्यावर वाणी यांनी आक्षेप घेतला. टाकीत आधीचे दहा लीटर डिझेल होते तर टाकीची क्षमता ८० लीटरची आहे, त्यामुळे १२ लिटर डिझेल जास्त कसे असू शकते म्हणून त्यांना जाब विचारला. यावेळी मालक गोपाळ पलोड यांनाही घरुन बोलावण्यात आले. त्यांनी प्रकरण समजूत घेत वाणी यांची समजूत घातली. कर्मचाºयाची हातचलाखी किंवा मशिनमध्ये फेरफार असल्याचा संशय व्यक्त करुन वाणी यांनी वैध मापन शास्त्र विभागाकडे तक्रार केली. आपण बाहेरगावी असल्याचे सांगून रविवारी अधिकाºयांनी पंपावर येणे टाळले.सोमवारीही केले मोजमापरविवारी डिझेल भरल्यानंतर पैसे न दिल्याने पंपावरील कर्मचाºयाने वाणी यांना फोनकरुन पंपावर बोलावले. त्यावेळी वैध मापन शास्त्र विभागाचे निरीक्षक सी.डी.पालीवाल हे देखील आले होते. त्यांनी प्रमाणित मापाच्या सहाय्याने तपासणी केली असता ते नियमानुसार सिध्द झाले. त्यामुळे वाणी यांनी डिझेलचे पैसे दिले. वाणी यांच्या कारमध्ये डिझेल कमी असावे किंवा टाकीत दोष असावा अशी शक्यता पंप मालक गोपाळ पलोड व निरीक्षक पालीवाल यांनी व्यक्त केली.
जळगाव शहरात मापात पाप असल्याच्या संशयावरुन पेट्रोल पंपाची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 4:22 PM
पेट्रोल पंपाच्या मापात पाप असल्याच्या संशयावरुन ग्राहकाने केलेल्या तक्रारीची दखल घेत वैध मापन शास्त्र विभागाच्या अधिका-यांनी सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता गणेश कॉलनी रस्त्यावरील पलोट सर्वो इंटरप्रायझेस या पेट्रोल पंपाची तपासणी केली. या तपासणीत नियबाह्य काहीही आढळून आले नसल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे तर या अधिका-याच्या कार्यपध्दतीवर शंका असल्याने नाशिक आयुक्तांकडे तक्रार करण्याची भूमिका तक्रारदाराने घेतली आहे.
ठळक मुद्देग्राहकाची तक्रार १२ लिटर डिझेलची तफावत समाधान न झाल्याने आयुक्तांकडे तक्रार करणार