जिजाबराव वाघचाळीसगाव : 'त्या' छायाचित्रणातील कलाकृती...त्यांना जागतिक स्तरावर मानांकने मिळाली आणि त्या प्राईज विनरही ठरल्या. चाळीसगावात बंदीत स्टुडिओत घेतलेली गेलेली ही छायाचित्रे सातासमुद्रापार गौरविली गेली. अवलिया कलावंत केकी मूस यांनी छायाचित्रांव्दारे चाळीसगावचे नाव आंतरराष्ट्रीय कोरले. 'टेबलटॉप'च्या चार प्रकारातील तीन हजाराहून अधिक छायाचित्रे मूस कलादालनात जतन करण्यात आली आहे. म्हणूनच फोटोग्राफीदिनी या कलाकृतींचे तेज आणखी झळाळून निघते. त्यांचे कालातित महत्व देखील अधोरेखित होते.मूस यांनी स्वतःला आपल्या घरातच 'होम क्वारंटाईन' करुन घेतले होते. जवळपास चार दशके हा कलावंत आपल्या घराच उंबरा ओलांडून बाहेर पडलाच नाही. त्यांनी स्वतःला कोंडून घेत एकाकी कलासाधना केली. याच साधनेतून अप्रतिम कलाकृती साकारल्या. टेबलटाॕप प्रकारातील त्यांची छायाचित्रे जागतिक स्पर्धांमध्ये अव्वल ठरली. टेबलटाॕप छायाचित्रणात मूस यांचा हातखंडा होता. आपल्या बंदित स्टुडिओत त्यांनी ही कला जोपासली.टेबलटाॕप छायाचित्रणाचा बादशहामूस यांना टेबलटॉप फोटोग्राफीतील बादशहाच संबोधले जाते. त्यांनी जोपासलेल्या या कलेमुळेच देशात पुढे टेबलटॉप फोटोग्राफीला वलय मिळाले.टेबलटॉप छायाचित्रणात एखादे दृष्य स्टुडिओतच उभारले जाते. ते कृत्रितरित्या साकारलेले असते. प्रकाश योजूनेतून ते दृष्य हुबेहुब खरे वाटले पाहिजे. अशी कल्पकता त्यात असते. अशी अनेकविध भासमान दृष्ये उभारुन आणि त्यात प्रकाशयोजनेचा अचूक वापर करीत मूस यांनी ती आपल्या कॕमे-यात कैद केली.1..'विंटर इन इंग्लंड', 'विंटर इन स्विर्झलॕड', 'वे टू रुईन' (विनाशाचा मार्ग) या छायाचित्रांना राष्ट्रीय स्तरावर गौरविले गेले. वे टू रुईनला १९४३ मध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला.*चार प्रकारातील तीन हजार छायाचित्रेटेबलटॉप फोटोग्राफीतील सिम्पल, सिम्बाॕलिक, हृयुमरस, फेक अशा चार प्रकारात मूस यांनी दृष्ये साकारुन त्यांची छायाचित्रे घेतली. त्यांच्या कलादालनात अशी तीन हजाराहून अधिक छायाचित्रे पहावयास मिळतात. सिम्पल टेबलटॉफ छायाचित्रणातील लॕन्डस्केप, स्टीललाईफ, पोट्रेट, इव्हेंट याप्रकारातील ही छायाचित्रे पाहणा-याला मंत्रमुग्ध करुन सोडतात. पोट्रेट प्रकारातील दिड हजार छायाचित्रे आहेत.
द विच वूमन अॉफ चालीसगावचा जागतिकस्तरावर सन्मान*पोट्रेट प्रकारातील द विच वूमन अॉफ चालीसगाव या छायाचित्राला १९४७मध्ये जागतिक स्तरावरचा सन्मान लाभला. लाकडाची मोळी विकणा-या म्हातारीचे हे छायाचित्रे होते. स्वतः इंग्लंडच्या राणी यांनी या छायाचित्राची दखल घेऊन मूस यांना राॕयल फोटोग्राफी सोसायटी अॉफ ग्रेट ब्रिटनची फोलोशीप बहाल केली
अन् पंडीत नेहरुही भारावले*१९५२ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु खान्देशाच्या दौ-यावर आले होते. चाळीसगाव येथूनच ते धुळे येथेही गेले. सायंकाळी दिल्लीला परतण्यासाठी रेल्वेस्थानकावर आले. त्यांनी मूस यांना भेटण्यासाठी बोलावले. मात्र मूस घराबाहेर पडले नाही. शेवटी पंडीत नेहरु त्यांच्या स्टुडिओत आले. त्यादिवशी कॕमे-याचा रोल संपल्याने मूस यांचे छायाचित्र घेता आले नाही.1..'युनिक पोट्रेट माय लाईफ'ं कालांतराने मूस यांनी टेबलटॉप प्रकारात पृथ्वीचा गोल घेऊन त्यावर गांधी टोपी ठेवत एका बाजूला गुलाबाचे फुल ठेवले. असे दृष्य उभारले. त्याचे छायाचित्र घेऊन ते पंडितजींना पाठविले. हे पोट्रेट पाहून पंडित नेहरु भारावले. युनिक पोट्रेट अॉफ माय लाईफ. अशी दाद त्यांना मूस यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केल्याची आठवण कलादालनाचे अध्यक्ष कमलाकर सामंत यांनी 'लोकमत' बोलतांना जागवली.