शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

भर बाजारात रिक्षात उतरला विद्युत प्रवाह, खाकी ठरली देवदूत!

By सागर दुबे | Published: April 18, 2023 3:13 PM

महात्मा फुले मार्केटच्या समोर विद्युत डीपी जवळून रिक्षा घेऊन जात असताना बाहेर आलेली विद्युत तार रिक्षाच्यावरील पाईपमध्ये अडकली.

जळगाव : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय सोमवारी सायंकाळी जळगावकरांना आला. भर बाजारात महात्मा फुले मार्केटसमोर एक रिक्षाच्या पाईपमध्ये विद्युत तार अडकली आणि रिक्षात विद्युत प्रवाह उतरला. नेमके त्याच वेळी तेथून जात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने ही बाब हेरली आणि देवदूत बनून मदतीला धावून गेला. पोलिसाच्या सतर्कतेने गर्दीत अनेकांचे प्राण वाचले.रमजान ईद व अक्षय तृतीया असल्याने सध्या शहरातील बाजारामध्ये नागरिकांची गर्दी अधिक आहे. सोमवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास टॉवर चौकाकडून घाणेकर चौकाकडे रिक्षा क्रमांक एमएच.१९.सीडब्ल्यू.४५९० जात होती. महात्मा फुले मार्केटच्या समोर विद्युत डीपी जवळून रिक्षा घेऊन जात असताना बाहेर आलेली विद्युत तार रिक्षाच्यावरील पाईपमध्ये अडकली.

प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला...दरम्यान, चालक दीपक बन्सीलाल देवराज (रा.मोहन नगर) यांच्या हाप्रकार लक्षात येताच ते बाहेर पडले. पण, तोवर रिक्षात विद्युत प्रवाह संचारल्याने दीपक देवराज यांना देखील झटका बसला. शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रदीप नन्नवरे हे प्रतिबंधात्मक कारवाईतील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा येथे हजर करून पुन्हा पोलीस ठाण्याकडे जात असताना त्यांना तो प्रकार दिसला. दुचाकीवरून उतरून त्यांनी लागलीच सर्व नागरिकांना बाजूला केले. चालक दीपक देवराज यांना विद्युत झटका बसला असल्याने प्रदीप नन्नवरे यांनी त्यांना मीठ मिश्रीत पाणी पाजले. पोलीस कर्मचारी प्रदीप नंन्नवरे यांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अपघातामुळे मोठी गर्दी जमली होती मात्र महावितरण कर्मचाऱ्यांनी धाव घेत विद्युत प्रवाह खंडित करून तार बाजूला केली. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. 

टॅग्स :Jalgaonजळगाव