ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 12 - तोंडावर गुंगीचे औषध फवारुन चोरटय़ांनी गुरुवारी मध्यरात्री मेहरुण तलाव परिसरातील बांधकामाच्या ठिकाणी कामाला असलेल्यातीन सुरक्षा रक्षकांच्या घरी चोरी करुन मोबाईल, दागिने व रोकड लांबविल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आह़े यातील एका घटनेत महिलेल्या गळ्यातील पोत लांबविण्याचा प्रय} केल्याने जाग आल्याने दोन दुचाकीवर आलेल्या चार चोरटय़ांनी पळ काढला़
पाचोरा रस्त्याला लागून मेहरुण तलावाकडे जाणा:या रस्त्यावर दाणाबाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण पगारिया यांच्या निवासस्थानाचे दोन वर्षापासून बांधकाम सुरु आह़े याठिकाणी वावडदा येथील वसंत सदाशिव गोपाळ हे पत्नी व मुलगीसह राहतात़ मुलगी सारिका व पत्नी जिजाबाई हे पत्र्याच्या खोलीत तर वसंत हे बांधकामाच्या ठिकाणी मोकळ्या जागेत खाटेवर झोपले होत़े मध्यरात्री 12़30 वाजेच्या सुमारास चोरटय़ांनी कुणाला जाग येवून नये, वसंत यांच्या त्यांची पत्नी व मुलगी या तिघांच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारल़े सुरुवातीला वसंत यांच्या उशाशी ठेवलेला मोबाईल घेतला़ यानंतर पत्र्याच्या खोलीत झोपलेल्या सारिका हिच्या पायातल्या चांदीच्या साखळ्या अलगद काढून घेतल्या़ यादरम्यान जिजाबाई यांच्या गळ्यातील मंगलपोत लांबविण्याचा प्रयत्न केला़ यादरम्यान जिजाबाई यांना जाग आल्याने त्यांनी आरडाओरड केला़ यादरम्यान चोरटय़ांनी पळ काढला़
चोरटे काही अंतरावर असलेल्या सचिन राका यांच्या बांधकाम सुरु असलेल्या बंगल्याकडे गेल़े याठिकाणी सात ते आठ महिन्यांपासून प्रेमसिंग रोहीदास जाधव रा़जंगलतांडा ता़सोयगाव हे सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आह़े पत्नी व मुलांबाळासोबत ते शेडमध्ये राहतात़ रात्री 11 वाजता जाधव कुटुंब झोपल़े प्रेमसिंग हे बांधकामाच्या ठिकाणी खाटवर झोपले होत़े चोरटय़ांनी त्यांचा उशीखाली ठेवलेला दोन हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबविला़ सकाळी उठल्यावर 6 वाजता उठल्यावर मोबाईलचा शोध घेतला असता प्रेमसिंग यांना चोरटय़ांनी मोबाईलमधील फेकून दिलेले सीमकार्ड सापडल़ेजाधव यांचा मोबाईल लांबविल्यानंतर चोरटे जळगाव-पाचोरा रस्त्याला लागूनच सुरु असलेल्या अजय ललवाणी यांच्या बांधकामाच्या ठिकाणी गेल़े याठिकाणी सात महिन्यांपासून पूनमचंद जोधाराम राठोड सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत़ पूनमचंद व पत्नी प्रमिलाबाई राठोड हे वृध्द दाम्पत्य याचठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये राहतात़ याठिकाणी चोरटय़ांनी घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत पूनमचंद राठोड यांच्या उशाशी असलेला मोबाईल लांबविला़