ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 3 - शिवाजीनगरातील उस्मानिया पार्कमध्ये शनिवारी सकाळी गोवंशची हत्या केल्यावरुन वाद झाल्याची घटना घडल्यानंतर पुन्हा रात्री साडे दहा वाजता शिवाजीनगरात दगडफेकीची घटना घडल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. या दगडफेकीत एक मुलगी किरकोळ जखमी झाली. तिच्यावर जवळच्या दवाखान्यात उपचार करण्यात आले. दगडफेकीमुळे परिसरात पळापळ व घबराट निर्माण झाली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्यासह सहका:यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, शिवाजी नगर मित्र मंडळाच्या दिशेने काही अज्ञातांनी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास दगड व विटांचा मारा केला. त्यामुळे पळापळ झाली. याबाबतची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. दगडफेक कोणी केली याची माहिती पोलीस उशिरार्पयत मिळविण्याच्या प्रय}ात होते. दरम्यान, या घटनेच्या पाश्र्वभूमीवर शिवाजी नगर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. वरिष्ठ अधिका:यांनीही या घटनेची माहिती घेतली.