पारोळा, जि.जळगाव : येथील बालाजी संस्थांनकडून साजरा होणाऱ्या ब्रह्मोत्सवाची सुरुवात शुक्रवारी स्तंभपूजनाने करण्यात आली. सकाळी ६.१० वाजता संस्थांनचे मुख्य विश्वस्त श्रीकांत शिंपी यांच्या हस्ते हे पूजन करण्यात आले.पारंपरिक पद्धतीने हे स्तंभपूजन झाले. अर्चक संजय पाठक यांनी ही पूजा मांडली होती. या वेळी संस्थानचे कार्याध्यक्ष रावसाहेब भोसले, विश्वस्त डॉ.अनिल गुजराथी, डॉ.नंदू सौदनी, प्रकाश शिंपी, संजय कासार, दिनेश गुजराथी, केशव क्षत्रिय, अरुण वाणी, चंद्रकांत शिंपी, दिलीप शिरूडकर, प्रमोद शिरोळे, बापू कुंभार, बापू शिंपी, राजेंद्र चौधरी, डी.डी.वाणी, सुनील शिंपी आदी उपस्थित होते.या वेळी बालाजी संस्थांनकडून साजरा होणारा ब्रह्मोत्सवात वहन व रथोत्सव मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रभू बालाजी महाराजांकडे या वेळी घातले जाते आणि वर्षभर सर्व तालुकावासीयांवर कृपादृष्टी असू देत यासाठी व स्तंभपूजन करून या उत्सवाची सुरुवात केली जाते.या वेळी रमेश शिंपी, कृष्णा बारी, अमोल भावसार, राजू शिंपी, अरुण लोहार यांनी परिश्रम घेतले.
पारोळा बालाजी संस्थानाकडून स्तंभपूजन व मंडप पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 5:12 PM