संजय पाटीलअमळनेर : तालुक्यातील पिळोदे येथील शेतकऱ्याच्या घराला रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत कापूस विक्री करून आलेल्या तीन लाखांचा रोकड शसह संपूर्ण संसार जळून खाक झाला.पिळोदा येथील शेतकरी अशोक केशवराव शिंदे हे आपल्या पत्नीसह घराला कुलूप लावून शेतात गेले होते. रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घरातून धुराचे लोळ निघताना काही ग्रामस्थांनी पाहिले. यानंतर आगीने रुद्र रूप धारण करत अशोक शिंदे यांच्या घरातील नुकताच कापूस विक्रीतून आलेले तीन लाख रुपयांची रोख रक्कम व संसार जळून खाक झाला. आग एवढी मोठी होती की त्यांच्या घरातील धातूचे भांडे वितळून गेले. या आगीत त्यांच्या शेजारी असलेले प्रकाश साहेबराव शिंदे यांचे गुरांच्या चारा भरलेले घरसुद्धा जळून खाक झाले. यामध्ये त्यांचा वर्षभरासाठी साठवलेला चारा जाळून खाक झाला.अमळनेर पालिकेच्या अग्निशमन दलाने ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले खरे, पण तोपर्यंत अशोक शिंदे यांचे आयुष्य या आगीत उद्ध्वस्त झाले होते. तसेच प्रकाश पाटील यांचेसुद्धा मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नगरपालिकेचा अग्निशामक बांम्ब व गावकऱ्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली.
पिलोदे तेथे घराला आग, कापूस विक्रीचे तीन लाख रुपये आगीत जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 2:12 PM