पहूर ता जामनेर :- पिंपळगाव कमानी तांडा, ता. जामनेर येथील रहिवासी भोजराज सावजी राठोड याने शुल्लक कारणावरून शांताबाई मदन चव्हाण( ६०) या वृद्ध महिलेच्या डोक्यात लाकडी दांडका टाकल्याने ती गतप्राण झाली. ही घटना गुरवारी सकाळी आठ वाजता घडलीे. याप्रकरणी पहूर पोलीसांनी संबधीत युवकाविरूद्ध गुन्हा दाखल करूनअटक केली आहे.प्राप्त माहिती नुसार अंगणात बैल गाडी सोडण्याच्या कारणावरून भाऊलाल मदन चव्हाण व भोजराज सावजी राठोड यांच्यात भांडण होऊन हाणामारी झाली. यादरम्यान शांताबाई मदन चव्हाण या दोघांचे भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता भोजराज सावजी राठोड याने या महिलेच्या डोक्यात लाकडी दांडका मारल्याने महिला जमीनीवर कोसळून प्रचंड रक्त स्त्राव झाला. ही घटना पाहून भोजराज याने स्वत: चे डोके फोडून घेतले.यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी अवस्थेत शांताबाईला पहूर ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.पाचोरा विभागाचे डिवायएसपी ईश्वर कातकडे, सपोनि राजेश काळे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन परीस्थिती वर नियंत्रण ठेवले. तसेच चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे यांनी पहूर येथे भेट देऊन याबाबत सविस्तर माहिती घेतली. तपास पोउपनिरीक्षक किरण बर्गे करीत आहे.अटक केल्यावर मृतदेह घेतला ताब्यातभोजराज याने घटनेनंतर पलायन केले. त्यामुळे जोपर्यंत भोजराजला अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा मयत महिलेच्या नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे सहाय्यक फौजदार अनिल अहिरे व भरत लिंगायत यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार घेतांना भोजराजला अटक केली आहे.त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेवून अंत्यसंस्कार केले. भाऊलाल मदन चव्हाण यांच्या फिर्यादीवरून भोजराज राठोड विरुद्ध भा.द.वी.३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भोजराज कोणभोजराज हा रेशन दुकानदार आहे. गावातील काही नागरीकांनी त्याच्याविरुद्ध रेशन संदर्भात तहसीलदार यांच्या कडे तक्रारी केल्या आहेत. तक्रार करणाºया नागरिकांशी भोजराज भांडण करीत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. विशेष म्हणजे भोजराजला बोलता येत नाही.पोलीसांचा धाक संपूष्टातगेल्या काही काळापासून पहूर पोलीस स्टेशनहद्दीत शुल्लक कारणावरून भांडण व त्याचे रूपांतर हाणामारीत होत असल्याचे दिसून येत आहे. पोलिस कारवाई थातुरमातुर होत असल्याने सबंधित समाजकंटकांना जरब बसत नसल्याने कमानीतांडा, कासली, वाकडी य ागावातखुनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पोलीसांचा धाक संपुष्टात आल्याचे बोलले जात असून सर्व सामान्य नागरिक भयभीत झाले आहे.
पिंपळगाव कमानी तांड्यावर शुल्लक कारणावरून महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 4:09 PM