एस. एम. जैन ।पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा : येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकंती करतांना दिसत आहेत. १५ दिवसाआड ४० मिनिटे पाणीपुरवठा होत असल्याची गंभीर स्थिती आहे.पिंपळगाव हरे. येथे गेल्या वर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे यावर्षी ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असे संकेत जाणकारांनी व्यक्त केले होते. त्याचा अनुभव आज रोजी पिंपळगाव करांना येत आहे.पिंपळगाव हरे. हे पाचोरा तालुक्यातील मोठे गाव आहे. लोकसंख्या सुमारे ३० हजार आहे. पाणी पुरवठ्यासाठी गावात ७५ व्हॉल्व्ह असून जनावरे व कपडे धुण्यासाठी ८ हाळ (पाण्याचे कुंड) आहेत. महिला स्वच्छतागृहासाठी मुख्य जलवाहिनी वरुन पाणी पुरवठा होत आहे.पाणी टंचाईस तोंड देण्यासाठी ग्राम पंचायतीचे प्रयत्नगावातील जुन्या विहिरीतील गाळ काढणे काही विहिरीत आडवे बोअर लावणे अशी कामे ग्रामपंचायत करीत आहे. गावात ७ विंधन विहिरी आहेत. बाजार पेठेतील विंधन विहिरीला चांगले पाणी आहे. हॉटेल व परिसरातील ग्रामस्थांना तेथून पाणी मिळते. गावातील ७ विंधन विहिरींपैकी आठवडे बाजार, गोविंद महाराज देवालय व हरेश्वर देवालय जवळील विंधन विहिरीवर शासकीय योजनेतून सोलर पंप व ५ हजार लिटरची पाण्याची टाकी बसवणार आहेत. धरण क्षेत्रात २ विहिरी सारखे खड्डे आहेत त्यात झिरपून येणाऱ्या पाण्यासाठी वीज पंप, धरण क्षेत्रात असलेल्या विहिरीवर तीन वीज पंप सुमारे १२ तास पाणी उपलब्ध करीत आहे असे पाणी एकत्र करून गावाला १५ दिवसात ४० मिनिटे पाणी पुरवठा केला जात आहे.कल६ कि. मी. लांब असलेल्या कोल्हे धरणावरुन पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी शासनान ४ कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. मात्र ही योजना घोडसगाव धरणा पासून ४ कि. मी. अंतरावरील झिंगापूर धरणावरुन केल्यास पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविला जाईल.दरम्यान सध्या गावकरी पाणी टंचाईने त्रस्त झाले असून याची दखल घेत राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष घालावे आािण ही समस्या सोडवावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.धरणात केवळ मृतसाठा शिल्लकपिंपळगाव हरे. येथे घोडसगाव धरणातून पाणीपुरवठा होतो. अत्यल्प पावसामुळे नदीला पूर नाही मात्र अजिंठा डोंगरावर झालेल्या जोरदार पावसामुळे सोयगाव तालुक्यातील झिंगापूर धरण भरले व त्याचेच काही पाणी घोडसगाव धरणात आल्याने धरणात काही प्रमाणात पाणी आहे. त्या पाण्याचा काटकसरीने वापर पिंपळगाव ग्रा.पं. करीत आहे. आता धरणात केवळ मृतसाठा शिल्लक आहे. धरण क्षेत्रातील जलस्वराज्य योजना व क्षेत्रातील काही विहिरी याचा उपयोग करून आज रोजी गावाला १५ दिवसांनी पाणी दिले जात आहे असे सरपंच म्हणाले.
पिंपळगाव हरेश्वर येथे १५ दिवसांआड पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 3:45 PM