जळगाव : प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंप्राळा येथील विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी रथोत्सव साजरा होत असून यासाठी हजारोंच्या संख्यने भाविक दाखल झाले आहेत. यंदाच्या आषाढी एकादशीला रथोत्सवाला १४४ वर्षे पूर्ण होत आहे़ ‘जानकाबाई की जय’च्या जयघोषात भाविकांकडून मोठ्या भक्तीभावाने रथ ओढला जात आहे. या दिवशी संपूर्ण भक्तीमय वातावरण पिंप्राळा नगरीत पसरले आहे़ पिंप्राळ्यात यात्रेचाही उत्साह आहे़यंदाच्या वर्षापासून प्रथमच पहाटे ५ वाजता भगवंत विठ्ठल व रूक्मिीणी मातेच्या मृतींचे महाभिषेक करण्यात आला़ रथोत्सवासाठी जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार सुरेश भोळे, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन आदी उपस्थित होते. पूर्वी रथाच्या चाकाजवळ मोगरी लावणारे स्वयंसेवक तेलाने पेटविलेल्या मशालीच्या प्रकाशातून रथाला मोगरी लावण्याचे जिकरीचे काम करीत असत़ कालांतराने मशालीचे प्रकाशाकडून कंदीलच्या प्रकाशात रथाला मोगरी लावण्याचे काम होऊ लागले़ त्यानंतर गॅसबत्ती आली व अखेर जनरेटरच्या माध्यमातून लाईटींगच्या रोषणाईत मोगरी लावण्याचे काम होत आहे़
प्रतिपंढरपूर पिंप्राळानगरीत रथोत्सवानिमित्त भक्तांचा मेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:46 PM