जळगाव : पिंप्राळा येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थान, वाणी पंच मंडळ व ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने दरवर्षी आषाढी एकादशीला निघणाऱ्या पिंप्राळा रथोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, सोमवार, २३ रोजी सकाळी साडे अकरा वाजता श्री पांडूरंगाच्या रथाची महापूजा होऊन, रथोत्सवाला सुरुवात होणार आहे. यंदाचे हे १४३ वे वर्ष आहे.दरवर्षी आषाढी एकादशीला हा रथोत्सव निघत असतो. रथोत्सवाच्या सुरुवातीला श्री विठ्ठल मंदिरामध्ये सकाळी ७ वाजता वाणी समाजाच्या वतीने अभिषेक पूजन होणार आहे. यामध्ये रथावरील राधा कृष्णाची मूर्ती, अर्जुन (सारथी), घोडे, गरुड मूर्ती व हनूमान मूर्ती यांची यावेळी विधीवत पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर पांडूरंग भजनी मंडळ मंदिरामध्ये टाळ-मृंदगाच्या गजरात भजन होऊन, तेथील राधा-कृष्णाच्या मूर्ती साडेअकरा वाजता दुपारी रथावर विराजमान करणार येणार आहेत.रथामध्ये परंपरेनुसार विधीवतपणे सर्व देव विराजमान केल्यानंतर, सकाळी साडेअकरा वाजता पंढरीनाथ विठ्ठल वाणी यांच्याहस्ते सपत्नीक रथोत्सवाची पूजा होणार आहे.दुपारी बारा वाजता माजी मंत्री सुरेशदादा जैन, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याहस्ते रथाची महाआरती होणार आहे.दुपारी बारा वाजता महाआरती झाल्यानंतर, कुंभारवाडा, भिलवाडा, मढी चौक, धनगरवाडा मार्गेे पिंप्राळा रिक्षा स्टॉप या ठिकाणी सायंकाळपर्यंत रथ येतो.प्रसाद तयाररथोत्सव मार्गावर भक्तांना धने, गुळ, सुठं, विलायची व खोबरे या पासून तयार केलेला प्रसाद वाटप केला जातो. यंदा भक्तांना वाटण्यासाठी साडेतीन टनांचा प्रसाद तयार करण्यात आला आहे, अशी माहिती विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष मोहनदास वाणी यांनी दिली. दरम्यान, पिंप्राळा रथोत्सवासाठी रस्त्याची डागडूजी पूर्ण करण्यात आली आहे.
पिंप्राळा रथोत्सवाची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:36 PM
१४३ वे वर्ष
ठळक मुद्देसोमवारी रथोत्सवरथाची महापूजा