ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.28-पिंप्राळ्यातील विठ्ठल मंदिर संस्थान व वाणी पंच मंडळाच्यावतीने 142 वर्षांची परंपरा असलेला पिंप्राळा रथोत्सव 4 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी काढण्यात येणार आहे. त्यासाठी पिंप्राळा परिसरात जोरदार तयारी सुरू असून रथमार्ग दुरुस्ती सुरू आहे. या निमित्त पिंप्राळा परिसरात भक्तीमय वातावरण पहायला मिळत आहे.
रथोत्सवाची तयारी पूर्णत्वाकडे आली असून सोमवारी रथाला धुण्यात आले. तसेच गुरुवारी रथाची सजावट करण्यात येणार असून रंगरंगोटी करण्यात येणार असल्याची माहिती वाणी पंच मंडळाचे मोहन वाणी यांनी दिली. दरवर्षी पूजेचा मान वाणी समाजातील एका व्यक्तीला देण्यात येतो. रथाच्या सुरुवातीला होणारा सत्कार समारंभ यंदा पिंप्राळ्यातील गांधी चौकात होणार आहे. त्यानंतर भजनीमंडळ विठ्ठल मंदिरात जाऊन त्या ठिकाणावरून देवांच्या मूर्ती सोबत घेऊन त्या रथावर विराजमान केले जाणार आहेत. त्यानंतर पिंप्राळ्यातील चावडीपासून रथाचे मार्गक्रमण सुरू होणार आहे.
महानगर पालिकेकडून रथाच्या मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत असून, ज्या ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. त्या ठिकाणी कॉँक्रींटने खड्डे दुरुस्ती केले जात आहेत. तसेच काही झाडांच्या फांद्यादेखील तोडण्यात आल्या आहेत. तर मो:या तयार करण्याचे कामदेखील जोरात सुरूआहे.