वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : पाचोरा तालुक्यातील पिंप्री बुद्रूक (डांभुर्णी) येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे स्रेहसंमेलन उत्साहात झाले.दीड हजार लोकसंख्येच्या गावात इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेची स्थापना सन १९३४ ला झालेली आहे. शाळा स्थापनेनंतर येथे प्रथमच स्रेहसंमेलन झाले.यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी सदस्य उद्धव मराठे तर प्रमुख पाहुणे म्हणून बाफना कृषी विद्यालय, कोल्हे येथील चेअरमन रमेश बाफना व ग्रामस्थ होते. बालिका दिनाचे औचित्य साधत विद्यार्थिनी मेघना हिचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व तिच्या हस्ते वृक्षारोपणदेखील करण्यात आले.विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, मराठी-हिंदी सीनेगीत, देशभक्तीपर गीते, कोळी नृत्य, नाटिका, तथा लावणी नृत्य सादर करून आपल्यातील उपजत कलागुण उधळून सर्व ग्रामस्थांना व पालकांना सुखद धक्का दिला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान भेटीचा ऐतिहासिक प्रसंगसुध्दा यावेळी सादर करण्यात आला. विशेष म्हणजे या शाळेत वस्तीवर राहणारे, परिस्थितीने अत्यंत गरीब विद्यार्थी जास्त आहेत. त्यांनी त्यांच्यातील कलाकारीच्या श्रीमंतीचा परिचय देण्याची संधी सोडली नाही.यासाठी मुख्याध्यापक हिलाल कडू लोहार, शिक्षिका प्रतिभा शिवाजी उभाळे, तुषार बंडू पाटील, मीनाक्षी दिलीप अहिरे व शांताराम शिवलाल पाटील यांनी परिश्रम घेतले. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्यांनी, तरुण व ग्रामस्थ मंडळींचे सहकार्य लाभले.
पिंप्री बुद्रूक जिल्हा परिषद शाळेत रंगले स्नेहसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 12:42 AM
पाचोरा तालुक्यातील पिंप्री बुद्रूक (डांभुर्णी) येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे स्रेहसंमेलन उत्साहात झाले.
ठळक मुद्देशाळा स्थापनेनंतर प्रथमच झाले स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांनी कलागुणांनी उपस्थित भारावले