लोकमत ऑनलाईन चाळीसगाव, जि.जळगाव, दि. 2 : पाटणादेवी जंगल परिसराला लागून असलेल्या पिंपरखेड शिवारात गेल्या आठवडय़ात वनविभागाने लावलेल्या पिंज:यात सोमवारी पहाटे बिबटय़ा अडकला आणि जेरबंदही झाला. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पिंपरखेड शिवारासह उंबरखेडे, पिंपळवाड-म्हाळसा, सायगाव, मांदुर्णे आदी परिसरात बिबटय़ाने धुमाकूळ घातला आहे. उंबरखेडे येथे दोघांचे बळी घेतले तर सायगाव, पिंपळवाड -म्हाळसा येथील शेतात काम करणा:या महिलांना गंभीर जखमी केले आहे. वनविभागाने गेल्या आठवडय़ात पिंपरखेड शिवारात सहा ते सात ठिकाणी पिंजरे लावले होते. याचं पिंज:यात सोमवारी पहाटे बिबटय़ा अडकला. नागरिक भेदरले पिंज:यात जेरबंद झाल्यानंतर बिबटय़ाने डरकाळ्या फोडल्याने परिसरातील नागरिक चांगलेच भेदरले. काहींनी पिंजरे लावले तिथे शोध घेतला. या वेळी एका पिंज:यात बिबटय़ा अडकल्याचे दिसून आले. बिबटय़ा जेरबंद झाल्याची वार्ता समजाताच नागरिकांनी बिबटय़ाला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. बिबटय़ा एक की दोघे? आमदार उन्मेष पाटील यांनीही सकाळी साडेदहा वाजता प्रत्यक्ष बिबटय़ा जिथे पिंज:यात अडकला त्या पिंपरखेड शिवारात भेट देऊन वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांच्याकडून परिस्थितीचा आढावा जाणून घेतला. दरम्यान, जेरबंद झालेल्या बिबटय़ाचा अजून एक साथीदार असून त्याने उंबरखेडे परिसरात डेरा जमविला आहे. त्यामुळे दुसरा बिबटय़ा पिंज:यात कधी अडकणार? हा प्रश्न कायम असल्याचे या परिसरातील प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. चाळीसगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांनी सांगितले की, पिंपरखेड शिवारात बिबटय़ाने गायींवर हल्ले केले होते. बिबटय़ाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. उंबरखेडे परिसरातही पिंजरे लावण्यात आले आहेत.
पिंपरखेड शिवारात ‘बिबटय़ा’ जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 2:39 PM
डरकाळ्यांचा थरार : अन् नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
ठळक मुद्देपहाटेच अडकला पिंज:यातगायींवर केले होते हल्ले नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास