शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

सुरक्षा यंत्रणा भेदून कारागृहात पिस्तुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 12:38 PM

कारागृहाची लक्तरे वेशीवर

जळगाव : कारागृहातून कैदी पलायन होण्याची ही पहिली वेळ नसली तरी येथील सुरक्षा यंत्रणा भेदून एक नाही तर तब्बल तीन गावठी पिस्तुल कारागृहात येतात,याला नक्कीच कारागृह प्रशासन जबाबदार असून या घटनेमुळे कारागृहाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. दरम्यान, कारागृहाच्या आतील व बाहेरील सीसीटीव्ही यंत्रणा सहा महिन्यापासून बंद असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.पिस्तुलचा धाक दाखवून सुशील अशोक मगरे (३२,रा.कसबे पहूर, ता.जामनेर), गौरव विजय पाटील (२१, रा.तांबापुरा,अमळनेर) व सागर संजय पाटील (२२, पैलाड,अमळनेर) या तीन न्यायालयीन बंदींनी कारागृहातून फिल्मीस्टाईल पलायन केल्याची थरारक घटना उघड झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम व त्यांचे पथक कारागृहात दाखल झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या चौकशीत कारागृहात अनेक गंभीर प्रकार उघड झाले असून बॅरेक व भींत यांच्यातील अंतर तसेच अंतर्गत सुरक्षेबाबत होणारा हलगर्जीपणा तसेच अनेक उणिवा आढळून आल्या आहेत.कारागृह शहराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करु : पालकमंत्रीया घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी कारागृहात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, या कारागृहात तटबंदीची गरज आहे. दोनशे बंदींची क्षमता असताना चारशेपेक्षा बंदी येथे आहेत, त्याशिवाय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. अधीक्षकपद रिक्त आहे, पंधरा दिवसापूर्वी प्रभारी अधीक्षकाची नियुक्ती झाली आहे. यात कारागृह प्रशासनाचा हलगर्जीपणा झाला असे म्हणता येणार नाही. सकाळी बंदी बाहेर येण्याची वेळ असते. रक्षक बेसावध असतानाही ही घटना घडली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तरतूद केली जाईल. सर्वात महत्वाचे म्हणजे कारागृह शहराबाहेर असणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रयत्न केले जातील. पळालेल्या संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.एलसीबीचे सहा पथके रवानातीन बंदी पलायन झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी जिल्ह्याच्या सर्व सिमांवर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी तातडीने सहा पथके जिल्ह्यात रवाना केले. या तिघांना पळवून नेणारा जगदीश पाटील व एक जण असे दोघं सकाळी साडे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास पारोळा शहरातून दुचाकीवर जाताना दिसल्याचेही सांगितले जात होते.रक्षकाची पोलीस व महानिरीक्षकांकडून चौकशीया प्रकरणात रक्षक पंडीत गुंडाळे यांच्यावरही संशय आल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम व त्यानंतर जिल्हा पेठ पोलिसांनी दुपारपर्यंत चौकशी केली.पंडीत गुंडाळे म्हणाले अपयश आले, पण जीव वाचला !या थराराक घटनेबाबत रक्षक पंडीत गुंडाळे यांना ‘लोकमत’ने बोलते केले असता ते म्हणाले, त्यांनी ‘आपबिती’ कथन केली. तिघांजवळ गावठी पिस्तुल होते. सुशील मगरे याने डोक्याला पिस्तूल लावून शिवीगाळ केली. दुसºयाने कॉलर पकडून जमिनीवर पाडले. खिशातून चावी काढण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला प्रतिकार केला. मात्र तिघांच्या ताकदीपुढे माझी ताकद अपूर्ण पडली, त्यामुळे ते पळाले. त्यात त्यांना यश व मला अपयश आले, पण माझा जीव वाचला. तिनही बंदीचा इतिहास हा शस्त्रांचाच आहे. यापूर्वी त्यांनी गोळीबार केला आहे. डोळ्यासमोर साक्षात मृत्यू असताना त्याच्यातून नशिबानेच बचावलो, अशी भावना गुंडाळे यांनी व्यक्त केली.उपमहानिरीक्षकांकडून दोन तास झाडाझडती... बंद्यांनी पलायन केल्याची माहिती मिळाल्यानंतर कारागृहाचे उपमहानिरीक्षक दिलीप झळके तातडीने औरंगाबाद येथून जळगावात दाखल झाले. दुपारी ४ वाजता ते कारागृहात पोहचले व सायंकाळी ६ वाजता परत औरंगाबादकडे रवाना झाले. दोन तासात त्यांनी कारागृहाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासह रक्षक पंडीत गुंडाळे यांची चौकशी केली. काही बॅरेकला त्यांनी भेटी दिल्या. सीसीटीव्ही बंद असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली, त्याशिवाय गावठी पिस्तुल कारागृहात कसे काय आले याचाही त्यांनी अधीक्षकांना जाब विचारला. दरम्यान, या प्रकरणाची अद्यापही चौकशी सुरु असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ ला दिली.भींतीवरुन पिस्तूल फेकल्याचा संशयसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहाच्या पाठीमागे असलेल्या गणेश नगरातून शुक्रवारी एका व्यक्तीने भींतीवरुन कारागृहात तीन पिस्तुल फेकले व ते सुशील, सागर व गौरव या तिघांनी घेतले. सुशील मगरे हा जगदीश पाटील (रा.पिंपळकोठा, ता. पारोळा) या तरुणाच्या संपर्कात होता. कुटुंब इतर नातेवाईकांच्या क्रमांकात मगरे याने कारागृह प्रशासनाकडे राहूल याचा मोबाईल क्रमांक दिलेला होता. त्यामुळे मोबाईलवर बोलून त्यांनी पिस्तुल आणण्यापासून तर पलायन करण्यापर्यंतचे नियोजन केले होते, त्यासाठी जगदीश हा शनिवारी सकाळीच कारागृहाच्या बाहेर काही अंतरावर दुचाकी घेऊन थांबला होता असेही तपासात निष्पन्न झालेले आहे. दरम्यान, याआधी देखील कारागृहात शस्त्र, गांजा, दारु व इतर साहित्य आढळून आलेले होते. त्याशिवाय कैदी पलायनाच्या घटनाही घडलेल्या आहेत. भींतीवरुन उडी घेऊन पलायन करणे व या भींतीवरुनच शस्त्र व इतर साहित्य कारागृहात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव