वरखेडे (जि.जळगाव) : येथून जवळच असलेल्या पिंपळवाड म्हाळसा ता.चाळीसगाव येथे २२ रोजी पहाटे तीन वाजता वनविभागाने विजय सुरेश देशमुख यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अखेरर जेरबंद बंद झाला. मात्र बिबट्या एक नसून दोन आहेत आहेत, असे येथील प्रत्यक्षदर्शींने सांगितले.ज्यावेळी बिबट्या (मादी) पिंजºयात अडकली तेव्हा तिला बाहेर काढण्यासाठी साथीदार बिबट्या प्रयत्न करत होता. त्यांचा आवाज एवढा जोरात की तो गावापर्यंत येत होता. गावकरी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी गेल्याने दुसरा बिबट्या पळाला.गेल्या तीन महिन्यांपासून गिरणा परिसरातील पिंपळवाड, वरखेडे, मेहुणबारे, रहिपुरी, वडगाव, उंबरखेडे आदी भागात बिबट्या दहशत होती. दररोज कोणाची अन कोणाचे पाळीव प्राण्याचा फडशा पाडत होता. यामुळे शेतकºयांसह ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.मी आधी ‘लोकमत’चे आभार मानतो. माझ्या तीन शेळ्या व एक वासरू खाल्ल्यानंतरदेखील वनविभागाचे अधिकारी सांगत होते की, या भागात बिबट्या नाही. मात्र ‘लोकमत’ने माझी बाजू घेत वृत्त प्रसिद्ध केले. मग कुठे वनविभागाने पिंजरा लावला.-विजय सुरेश देशमुख, शेतकरीअनेक दिवसांपासून वनविभागाचे कर्मचारी सदर भागात गस्त घालून होते . ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले होते व तो त्यात ट्रॅपदेखील झाले होते. म्हणून या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता. यामुळे बिबट्या पकडण्यात यश मिळाले.-संजय मोरे, तालुका वनाधिकारी, चाळीसगाव
चाळीसगाव तालुक्यात पिंपळवाड म्हाळसा येथे बिबट्या अखेर जेरबंद, मात्र दुसरा पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 8:55 PM
पिंपळवाड म्हाळसा ता.चाळीसगाव येथे २२ रोजी पहाटे तीन वाजता वनविभागाने विजय सुरेश देशमुख यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अखेरर जेरबंद बंद झाला. मात्र बिबट्या एक नसून दोन आहेत आहेत, असे येथील प्रत्यक्षदर्शींने सांगितले.
ठळक मुद्देगेल्या तीन महिन्यांपासून गिरणा परिसरात बिबट्याची होती दहशतदररोज कोणत्या तरी पाळीव प्राण्याचा पाडत होता फडशा