जामनेर, जि.जळगाव : ‘पाचोरा-जामनेर’ या नॅरोगेज मार्गावर धावणाºया आणि ‘पीजे’ या नावाने ओळखल्या जाणाºया रेल्वेला बुधवारी १०० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त गाडीचालकाचा सन्मान करण्यात आला.मुंबईच्या मे. शपुर्जी गोडबोले अॅण्ड कंपनीने या छोट्या रेल्वे मार्गाचे बांधकाम केले व ११ जुलै १९१८ रोजी पाचोरा ते पहूरपर्यंतच्या मार्गावर ही रेल्वेगाडी धावण्यास सुरुवात झाली. त्यानंतर वर्षभरात पहूर ते जामनेर मार्ग तयार झाला आणि पाचोरा-जामनेर मार्गावर पीजे रेल्वे धावू लागली. शेंदुर्णी येथून विड्याची पाने व जामनेर येथून केळी व धान्य पाठविण्यासाठी मालवाहतूक म्हणून या गाडीचा उपयोग व्हायचा.सुरुवातीच्या काळात पाचोरा- जामनेर या दरम्यान या ‘पीजे’च्या तीन फेºया होत असत. कोळशाच्या इंजिनवर ही गाडी धावायची. गेल्या काही वर्षांपासून दोनच फेºया होत आहेत. डिझेल इंजिन लागल्याने वेळेची बचत होते. वरखेडी, पिंपळगाव, शेंदुर्णी, पहूर व भागदारा या पाच थांबे आहेत. प्रवासी संख्यादेखील चांगली आहे. पाचोरा ते जामनेर हे ५६ कि.मी. अंतरासाठी दोन तास लागतात. पाचोºयासाठी १५ व इतर सर्व ठिकाणांसाठी १० रुपये भाडे असल्याने प्रवाशांची पसंती कायम आहे.दरम्यान, लॉर्ड गणेशा शाळेचे प्राचार्य लईशराम सिंंघा हे सकाळी शिक्षक व विद्यार्थ्यांसह रेल्वेस्थानकावर पोहचले. शंभरीचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी गाडीतील प्रवाशांना पेढे वाटले व गाडीचे चालक व कर्मचाºयांचा प्रशस्तीपत्रक देवून गौरव केला.
‘पीजे’ रेल्वेने केली शंभरी पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 1:22 AM