आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१६ : केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत पूर्वी प्रचंड कचरा असलेली १० ठिकाणे कचरा मुक्त झाल्याने या ठिकाणांवर रांगोळ्या काढून ते सजविण्यात आल्याने नागरिकांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण होऊन या ठिकाणी काही जण गर्दी करून होते.स्वच्छ भारत अभियानात स्वच्छ शहर २०१८ अंतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाय योजले जात आहेत. या अभियानात सतत कचरा पडून असलेल्या १० ठिकाणांवर मनपा आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केले होते. या ठिकाणांच्या परिसरातील व्यावसायिक, नागरिकांना कचरा हा कचरा कुंडीतच टाकला जावा अशा सूचना अगोदर देण्यात आल्या. त्यानंतर त्या ठिकाणच्या कचरा कुंड्या काढून घेण्यात आल्या. सततच्या जनजागृतीमुळे नागरिकांनी कचरा हा घंटागाडी आल्यावरच देण्यास सुरूवात केली. त्यामुळे ही ठिकाणे आता स्वच्छ दिसत आहे. ‘जी.व्ही.पी.’ गारपेट व्हर्नेबल पॉर्इंट म्हणजेच या जागा कचरा मुक्त झाल्याचे लक्षात आल्याने ही बाब नागरिकांच्याच्याही लक्षात यावे म्हणून ही १० ठिकाणे रांगोळ्या काढून गुरूवारी सुशोभित करण्यात आली होती. आरोग्याधिकारी उदय पाटील यांनीही काही ठिकाणांना भेटी दिल्या. कचरा पडून असलेली ठिकाणे अशा प्रकारे सुशोभित झाल्याने नागरिकांमध्येही या ठिकाणी उत्सुकता दिसून आली. काही जण रांगोळ्यांवरील स्वच्छतेचे संदेश वाचताना दिसत होते.आर.आर.विद्यालय स्वच्छ शाळाशासन निर्देशानुसार विविध विभागांसाठी स्वच्छता स्पर्धा मनपा आरोग्य विभागाने घेतली होती. यासाठी परिक्षक म्हणून नीर फाउंडेशनवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. परीक्षण आटोपल्यानंतर नीर फाउंडेशनचे निकाल घोषित केले आहेत. यात स्वच्छ हॉटेल - हॉटेल सायली ग्रीन, स्वच्छ शाळा- आर. आर. विद्यालय, स्वच्छ मार्केट - गोलाणी संकुल, स्वच्छ हॉस्पिटल- अग्रवाल हॉस्पिटल, एम.जे. कॉलेज रोड, स्वच्छ गृहनिहनिर्माण संस्था- सुकृत रेसीडेन्सी.कचरा मुक्तीची १० ठिकाणेट्राफीक गार्डन शाहून नगर, रोझ गार्डन शाहून नगर, पोलीस मल्टीपर्पज हॉल जवळ, गोलाणी मार्केट दत्त मंदिर बाजुचा रस्ता, फुले मार्केट सार्वजनिक शौचालयाजवळ, घाणेकर चौक, बालाजी मदिंराजवळ, कोल्हे गोडाऊन जुने जळगाव, डी.मार्ट समोर, भास्कर मार्केट दक्षता पेट्रोल पंप बाजुने ही दहा ठिकाणे कचरामुक्त झाल्याने रांगोळ्या काढून तो परिसर सुशोभित करण्यात आला.
जळगावात ज्या ठिकाणी होता कचरा त्या ठिकाणी साकारली रांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 1:04 PM
जळगावातील गोलाणी मार्केट ठरले स्वच्छ मार्केट
ठळक मुद्देमहापालिकेने केले १० ठिकाणांवर लक्ष केंद्रीतजळगावातील आर.आर.विद्यालय स्वच्छ शाळाजळगावातील १० ठिकाणे रांगोळ्या काढून केली सुशोभित