८ हजारांवर चाचण्या
जळगाव : सोमवारी जिल्हाभरात एकत्रित ८६४१ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यात ॲन्टीजन ७३०० तर आरटीपीसीआरच्या १३४१ चाचण्या झाल्या. तर आरटीपीसीआरचे १५९४ अहवाल आहे. दरम्यान, बाधितांचे प्रमाण काहीसे कमी होत असल्याचे एक समाधानकारक चित्र समोर आहे.
रावेरात रुग्ण वाढले
जळगाव : कोरोनाचे रावेर तालुक्यात रुग्ण वाढत असल्याचे गंभीर चित्र आहे. सेामवारी रावेरात १३० नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. रावेरात रुग्णसंख्या ४३२५ वर पोहोचली आहे. तर १२७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे सोमवारी रावेर तालुक्यातील ६२ रुग्णांनी कोरोनाव मात केली आहे.
ग्रामीणमध्ये २ मृत्यू
जळगाव : जळगाव ग्रामीणमध्ये सेामवारी दोन बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात एका ५८ व ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची संख्या ही वाढून १०८ वर पोहोचली आहे. ग्रामीणभागातही सातत्याने रुग्ण आढळून येत असून सोमवारी ३४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.