==========
रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
जळगाव : सध्या मनपाकडून पावसाळ्यापूर्वीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत खोटेनगर परिसरातील तसेच पिंप्राळा रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. तसेच अमृत योजनेंतर्गत खोदलेल्या खड्ड्यांची काही भागांमध्ये थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यांची योग्य दुरुस्ती व्हावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.
===========
सायंकाळी रहदारी वाढली
जळगाव : कोरोना संसर्ग वाढल्यामुळे प्रशासनाकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. विनाकरण वावरण्यासही मनाई करण्यात आली आहे. मात्र, गुरुवारी सायंकाळी शहरातील काही चौकांमध्ये रहदारी वाढलेली दिसून आली. तसेच स्वातंत्र्य चौकात वाहनधारकांची पोलीस व आरोग्य विभागाच्या वतीने अँटिजन चाचणी केली जात होती.
============
जैन महिला मंडळातर्फे स्पर्धा
जळगाव : महावीर जयंतीनिमित्ताने जैन महिला मंडळातर्फे घरोघरी जाऊन महावीर जन्म कल्याणक ऑनलाइन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत टिना पोलडिया, नीलेश कटारिया, कलावती चोरडिया, लक्षिता जैन, कविता पगारिया, स्वाती जैन, प्रियंका बोथरा तर प्रोत्साहनपर पुरस्कार श्वेता राका, निकिता रेदासनी यांनी स्पर्धात सहभाग घेऊन बक्षीस मिळवले.