मराठी प्रतिष्ठानतर्फे १५० करंजच्या झाडांची लागवड
जळगाव : मराठी प्रतिष्ठानतर्फे रविवारी महिला शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या मोहाडी रस्त्यापासून ते थेट रुग्णालयाच्या परिसरापर्यंत विविध ठिकाणी १५० करंजच्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. शासकीय महिला रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ यु. बी. तासखेडकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी जितेंद्र देशमुख, जनता बँकेचे शाखाधिकारी प्रसाद कोपरकर, डॉ. रवी महाजन, डॉ. रेखा महाजन, डॉ बेंद्रे, मनीषा पाटील, भानुदास वाणी, मनशक्ती चे अभय खांदे, प्रवीण गगराणी, अनघा गगराणी आदी पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकी एक रोप लाऊन वृक्षारोपण केले. या वृक्षारोपण मोहिमेत १०० नागरिकांनी सहभाग घेतला.
डॉ. रवी महाजन यांनी करंजच्या झाडांची १५० रोपे मराठी प्रतिष्ठानला दिले. यशस्वीतेसाठी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.जमील देशपांडे, संध्या वाणी, सविता नंदनवार, घनश्याम चौधरी, डॉ. विद्या चौधरी, कविता पाटील, बाळू पाटील, संतोष क्षीरसागर, चेतन परदेशी, बाळू पाटील आदींनी परिश्रम घेतले.