जळगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चेतना व्यसनमुक्ती केंद्र व सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने शुक्रवारी चेतना व्यसनमुक्ती केंद्राच्या पटांगणात ५१ वृक्षांचे रोपण करण्यात आले.यावेळी गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, वनक्षेत्रपाल पी़टी़वराडे, राष्ट्रीय हरित सेना सदस्य सुनील वाणी, अनिल साळुंखे, नितीन विसपुते, प्रवीण पाटील, शितल जडे आदींच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले़ यशस्वीतेसाठी सुवर्णा कुंभारे, कविता साळुंखे़ डॉ़ए़एम़चौधरी, गणेश विसपुते, प्रतिक सोनार, दीपक पाटील, फिरोज तडवी, तेजस वाणी, अभिषेक वाणी आदींनी परिश्रम घेतले.आय.एम.आर. महाविद्यालयात वृक्षारोपणजागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयएमआर महाविद्यालयात सोशल डिस्टन्सिंग पाळत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. कडुलिंबाची २० झाडे महाविद्यालयाचे परिसरात लावण्यात आली़ हा उपक्रम संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापकांनी.पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरीसर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे़ त्यामुळे घराबाहेर न जाता छाया सराफ व तारूणी सराफ या महिलांनी घराच्या छतावरच वडाचे वृक्ष साकारून पर्यावरणपूरक वटपौर्णिमा व जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यत आला. तसेच वृक्षतोड करू नका असा सामजिक संदेशही त्यांनी दिला.रोटरी क्लब जळगाव स्टाररोटरी क्लब जळगाव स्टारच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालसुधार कारागृहात वृक्षारोपण करण्यात आले़ यावेळी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांची प्रतिकारशक्ती चांगली रहावी म्हणून त्यांना औषध वाटप करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष सागर मुंदडा, धनराज कासट, जिनल जैन करण ललवाणी, नीलेश नाथानी, चेतन सोनी, बालसुधार कारागृहाच्या अधीक्षिका जयश्री पाटील, अश्विन मंडोरा,रोहित केसवानी, रोहित तलरेजा, योगेश कलंत्री, सचिन बलदवा आदी उपस्थित होते.