जळगाव : शहरातील विविध शाळा व सामाजिक संस्थांच्या वतीने गुरुवारी वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. वृक्षारोपणाचे महत्त्व यावेळी पटवून देण्यात आले. सुमारे शेकडो वृक्षांचे शहरातील विविध भागांमध्ये रोपण करण्यात आले.
जिजामाता विद्यालय
न्यू जागृती मित्र मंडळ संचालित जिजामाता माध्यमिक विद्यालय येथे राष्ट्रीय हरित सेना व स्काऊट गाईड आणि शासनाच्या वन महोत्सव कार्यक्रम अंतर्गत वडाच्या झाडाचे पूजन करून शालेय परिसरात लागवड करण्यात आली. यावेळी स्काऊट शिक्षक किशोर पाटील यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगितले. यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे, आशा पाटील, संगीता पाटील, कृष्णा महाले, दिनेश सोनवणे, विकास तायडे, आदी उपस्थित होते.
०००००००००
मुक्ती फाउंडेशन
मुक्ती फाउंडेशनतर्फे वटपौर्णिमानिमित्त वड वृक्षाचे पूजन करीत व वडाचे रोप देऊन वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. दादावाडी परिसरातील श्रीराम नगर येेथे हा कार्यक्रम घेण्यात आला. वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे, त्यामुळे वृक्षारोपण करावे, असे आवाहन मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी यांनी केले.
००००००००००
शकुंतला विद्यालय
शकुंतला विद्यालय जळगाव येथे वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे यांच्या हस्ते वडाचे रोप लावण्यात आले. याप्रसंगी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका राजश्री महाजन यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात किशोर वायकोळे यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून सांगितले. कार्यक्रमात प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नेहा जंगले, धनंजय फिरके, ललित चौधरी, राहुल चौधरी, भागवत चोपडे, उल्हास भोळे, अरविंद सूरवळक, सुनील नेहेते, योजना चौधरी, प्रतिभा किनगे, हर्षा इंगळे, स्वाती जंगले, लक्ष्मी भालेराव उपस्थित होते.
०००००००००००००
एनसीसी छात्र सैनिकांतर्फे वृक्षारोपण
१८ महाराष्ट्र एनसीसी बटालियन व मू.जे.च्या एनसीसी युनिटच्याच्या वतीने गिरणा नदीच्या काठावर दीड हजार सीड्स बॉलचे रोपण करण्यात आले. त्यासोबच पिंपळाच्या वृक्षाची देखील लागवड करण्यात आली. यावेळी एनसीसी छात्र सैनिक यांच्यासह डॉ. चेतना विसपुते, डॉ. नितीन विसपुते, डॉ. व्ही. एस. कंची, योगेश बोरसे, कोमल सिंग, आदींची उपस्थिती होती.