चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव शहरापासून जवळच असलेल्या कन्नड घाटाच्या पायथ्याशी कापसाच्या ट्रकला सात दरोडेखोरांनी अडवून चालकाच्या डोक्याला पिस्तूल लावून आठ लाख ७० हजार रुपयांचा १५ टन कापूस लांबविला आहे.१५ टन पांढऱ्या सोन्याची लूट झाल्यामुळे कापूस व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ट्रकचालक भगवान दगडूबा गव्हाड (रा.चिकलठाणा, जि.औरंगाबाद) हे आंबेलोहळ ता.गंगापूर, जि.औरंगाबाद येथून व्यापारी गणेश सोमनाथ रावते यांच्या मालकीचा १६१ क्विंटल कापसाने भरलेला ट्रक (क्रमांक एमएच-२०-ईजी-७१३५) अंजार, जि.भुज, गुजराज येथे विक्रीसाठी घेऊन जात होते. तेव्हा वाटेत ते गल्ले बोरगाव येथे ढाब्यावर जेवण करण्यासाठी थांबले. त्यानंतर रविवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान कन्नड येथील एकी पेट्रोलपंपावर ट्रकमध्ये डिझेल भरल्यानंतर कन्नड घाटाच्या खाली एका पेट्रोल पंपाजवळ चहा पिण्यासाठी थांबले.पुढे मार्गस्थ होण्यासाठी सहचालक रिजवान सलीम शेख (रा.जिंतूर, जि.परभणी) याने ट्रक चालविण्यासाठी घेतला. गतिरोधकावर ट्रकचा वेग कमी झाला. तेव्हा मागून आलेल्या एका पांढºया रंगाच्या कारने त्यांचा ट्रक अडविला. अंदाजे ३० ते ३५ वर्षीय त्यातील सात चोरट्यांनी चालक व सहचालकाच्या डोक्याला पिस्तूल लावून ट्रकचा ताबा घेतला.दोघांनाही ट्रकखाली उतरविले. डोक्याला काळे कापड लावून कारमध्ये बसवले व हिंदी भाषेत धमकी दिली की, ‘चुप-चाप गाडी में बैठो, नही तो गोली मार देंगे.’ सातपैकी चार जण ट्रकमध्ये बसले होते. त्यांनी ट्रकमधील आठ लाख ७० हजार रुपये किमतीचा १५ टन कापूस लांबविला. चालक व सहचालकाला रात्रभर कारने फिरवल्यानंतर पुन्हा ट्रकजवळ सोडून देण्यात आले.त्यानंतर त्यांनी ट्रकची पाहणी केली. तेव्हा ट्रकमध्ये फक्त एक टन कापूस शिल्लक होता. सोमवारी रात्री पोलिसांत चालक भगवान गव्हाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रकचालकाच्या डोक्याला पिस्तूल लावून साडे आठ लाखाचा कापूस चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 7:14 PM
चाळीसगाव शहरापासून जवळच असलेल्या कन्नड घाटाच्या पायथ्याशी कापसाच्या ट्रकला सात दरोडेखोरांनी अडवून चालकाच्या डोक्याला पिस्तूल लावून आठ लाख ७० हजार रुपयांचा १५ टन कापूस लांबविला आहे.
ठळक मुद्देकन्नड घाटाजवळील घटनाट्रकमधून १५ टन कापूस लांबविलाचोरटे होते सात