पारोळा : नगरपालिकेच्या वतीने १९ रोजी शहरात प्लॅस्टिक कॅरीबॅग जप्तीची बाजारपेठेत मोहीम राबविण्यात आली. यात हातगाडीधारकांसह अनेक दुकानदारांकडून पाच किलो प्लॅस्टिक कॅरीबॅग जप्त केल्या.ही मोहीम शहरात दररोज वेगवेगळ्या भागांत राबविण्यात येईल, असे मोहिमेचे प्रमुख व नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक विनोद इन्सुलकर यांनी सांगितले. सदर मोहीम मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यात विनोद इंन्सुलकर, सुरेश घुले, किशोर चौधरी, विस्वास पाटील, मोतीलाल महाजन, चेतन शिंदे, संदीप पाटील आदी कर्मचारी सहभागी होते. यावेळी व्यापारी, दुकानदार, भाजीपाला विक्रेत्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.पर्यावरणाची हानी थांबवण्यासाठी कायद्याप्रमाणे लायसन घेऊन कॅरिबॅग वापरता येतील. तसेच नर्सरीसाठी लागणारा कागद, पेपर वेस्ट मटेरीअल, दुधाच्या पिशव्या रिसायकल मटेरीअल, वॉटर बॅग आदींचे प्लॅस्टिक, मास्क, शेततळे ताडपत्री, शैक्षणिक साहित्यासाठी लागणारे प्लॅस्टिक वापरता येणार असून ५० मॅक्रॉनपेक्षा कमी प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर व विक्री करणाऱ्यांना नियमाप्रमाणे दंड ठोठावण्यात येईल, अशी तंबी मुक्याधिकारी मुंडे यांनी दिली़