आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.३-वाळू उपसा करण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. मात्र तालुक्यातील गिरणा नदीपात्रातून रात्रीच्या वेळी बेसुमार वाळू उपसा सुरु असल्याचे ‘लोकमत’ च्या चमुने गिरणा नदीपात्रातील काही स्थळांची पाहणी केली असता दिसून आले. रात्री ९ ते सकाळी सहा दरम्यान आव्हाणे, आव्हाणी, फुपनगरी, खेडी व निमखेडी परिसरातील गिरणा नदीपात्रातून सर्रासपणे चोरटी वाळू वाहतूक सुरु असल्याचे दिसून आले. महसूल, पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे.
३० सप्टेंबरपासून राज्यातील सर्व वाळू ठेक्यांची मुदत संपल्यानंतर वाळू उपसा बंद करण्यात आला आहे. तालुक्यातील फुपनगरी येथील वाळू ठेक्याचा लिलाव देण्यात आला होता. मात्र ठेक्याची मुदत संपल्यानंतरही या ठिकाणी सर्रासपणे वाळू उपसा सुरु आहे. हेच चित्र बांभोरी ते फुपनगरी पर्यंतच्या गिरणा नदी पात्रात पहायला मिळत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाळू व्यावसायिकांकडून वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या लाखो रुपयांच्या महसूलवर पाणी फेरले जात आहे.
रात्री ९ वाजेपासून सुरु होते वाहतूक‘लोकमत’च्या चमुने रात्री ९ वाजेच्या दरम्यान कानळदा रोड परिसरात पाहणी केली असता. रात्री १० ते १०.४५ दरम्यान वाळूचे फुपनगरीकडून जळगावकडे चार डंपर व दोन ट्रॅक्टर भरून गेले. तर रात्री ११ वाजता आव्हाणे येथील गिरणा पदीपात्रावर पाहणी केली असता. नदीपात्रात १० ते १२ डंपर व ट्रॅक्टरव्दारे वाळू उपसा सुरु होता. वाळू व्यावसायिकांकडून रात्री ९ वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रात डंपर उतरवले जातात.
पहाटे ६ सहावाजेपर्यंत सुरु असते वाळू वाहतूकरात्री ९ वाजेपासून सुरु झालेली वाहतूक सकाळी ६ वाजेपर्यंत सुरु असते. पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास कानळदा रस्त्यावर पाहणी केली असता. फक्त अर्ध्यातासाच्या अवधीत सुमारे १२ ते १५ डंपर वाळूने भरुन गेले. तसेच सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास खेडी येथून २ ट्रॅक्टर वाळूने भरून गेल्याचे चित्र पहायला मिळाले.
खेडी, फुपनगरी, आव्हाणे परिसरात सर्वाधिक उपसाआव्हाणे येथील वाळू ठेक्याचा दोन वर्षांपासून ग्र्रामस्थांनी विरोध केल्यानंतर येथील ठेक्याचा लिलाव करण्यात आलेला नाही. मात्र तरीही येथील नदीपात्रातुन सर्वाधिक वाळूची चोरटी वाहतूक होत आहे. आव्हाणे ग्रामस्थांनी नदीकडे जाणाºया रस्ता बंद केला असला तरी मात्र बांभोरी व निमखेडी परिसरातून ही वाहतूक सुरु आहे. तर खेडी व फुपनगरी येथील गिरणा नदीपात्रातुन देखील मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे.
प्रशासनाच्या अधिकाºयांवर देखील असते नजररात्री वाळू उपश्यासाठी डंपर नदीपात्रात उतरविल्यानंतर वाळू व्यावसायिकांचे अनेक पंटर रात्रभर पहारा देत बसविले जातात. कानळदा रस्त्यालगतच्या के.सी.पार्क परिसरात रात्री ८ ते १० वाळू व्यावसायिक बसले होते. तर खेडी फाटा व शहरातील गुजराल पेट्रोल पंप शेजारी देखील अनेक पंटर बसलेले दिसून आले. तहसीलदार किंवा महसुल विभागातील अधिकाºयांची गाडी नजरेस पडल्यावर लगेच नदीपात्रातुन डंपर इतरत्र हलविले जातात.