दिग्दर्शक अतुल पेठे व केतकी थत्ते यांच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना उत्तम कलाकृती अनुभवता आली.
या महोत्सवाला शनिवारी पद्मश्री भालचंद्र नेमाडे , कविवर्य ना धों महानोर, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन, माजी सनदी अधिकारी रविंद्र जाधव व राष्ट्रवादीचे पदाधिकारी विनोद देशमुख उपस्थित होते. या महोत्सवात मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास पुरस्काराचे विजेते चित्रकार शाम कुमावत यांचा अशोक भाऊ जैन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रंगकर्मी मंजुषा भिडे यांनी केले. यशस्वीतेसाठी मिलिंद जंगम, राहुल निंबाळकर, अमित माळी, अक्षय नेहे, पंजकुमार पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकार्य लाभले. दरम्यान, रविवारी महोत्सवाचा समारोप `कबीर` या सांगीतिक कार्यक्रमाने होणार आहे.