शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

‘नकुशी’ होऊ लागली हवीहवीशी, जळगावात सुखद चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 11:48 AM

जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढतोय

ठळक मुद्देधडक तपासणीमुळे धास्तीपाच वर्षाचा चढता आलेख

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ४ - स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठीची जनजागृती, सामाजिक संस्थांचा वाढता सहभाग आणि डॉक्टरांवर होणारी कारवाई अशा विविध कारणांमुळे जळगाव जिल्ह्यात मुलींचा जन्मदर दरवर्षी वाढतच असून ‘नकुशी’ आता हवीहवीशी होत असल्याचे सुखद चित्र जळगाव जिल्ह्यात आहे. गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला असता लिंग गुणोत्तर प्रमाण वाढतच गेल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.एकेकाळी गर्भनिदान करून गर्भपात करण्याचे प्रमाण अधिक असलेल्या जळगाव जिल्ह्यात मुलींचा घटता जन्मदर चिंतेची बाब होती. गर्भनिदान व गर्भपात करण्याच्या कारणांमुळे जळगावातील अनेक रुग्णालयांवर कारवाईदेखील झाल्या आहेत. मात्र आता चित्र पालटू लागले असून दिवसेंदिवस मुलींची संख्या वाढत असल्याचे चित्र आकडेवारीवरून समोर येत आहे.पाच वर्षाचा चढता आलेख२०१३मध्ये प्रति हजारी मुलांच्या तुलनेत ८२५ मुली होत्या. ही संख्या आज ८९८वर पोहचली आहे. २०१३ नंतर एकाच वर्षात २५ने ही संख्या वाढून २०१४मध्ये प्रति हजारी ८५० मुली जन्माला आल्या. त्यानंतर २०१५मध्ये ८६१, २०१६मध्ये ८७२, २०१७मध्ये ८८१ मुली जन्माला आल्या.धडक तपासणीमुळे धास्तीजिल्ह्यात प्रसूतीपूर्व प्रसूती धारणा कायदा नियंत्रण सल्लागार समितीच्यावतीने (पीसीपीएनडीटी) जिल्ह्यात तपासणी होऊ लागल्याने डॉक्टरांमध्ये धास्ती निर्माण होऊन गर्भलिंग निदानास आळा बसण्यास मदत होत आहे. त्यामुळे निदान न झाल्याने गर्भपातासही आळा बसून मुलीही आनंदाने हे जग पाहू लागल्या आहेत.तीन डॉक्टरांना शिक्षागेल्या सहा वर्षात या कायद्याचे उल्लंघन केल्याने तीन डॉक्टरांना शिक्षा झाली आहे. यामध्ये २०१२मध्ये एका डॉक्टराला तीन वर्षाची, २०१३मध्ये एक वर्षाची आणि २०१४मध्ये एका डॉक्टराला दोन वर्षाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे आता सहजासहजी कोणी कायद्याचे उल्लंंघन करण्यास धजावत नसल्याचे सांगितले जात आहे.या सोबतच सामाजिक संस्थांचा वाढता सहभाग, बेटी बचाव, बेटी पढाओ अंतर्गत मुलींच्या स्वावलंबन, पोषणाबाबतची जनजागृती यामुळेही मुलींच्या जन्मदर वाढीस चालना मिळत आहे.२५ रोजी झाली बैठकजिल्हास्तरावर असलेल्या पीसीपीएनडीटी समितीची बैठक २५ एप्रिल रोजी होऊन त्यात जिल्हाभरातील आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील रुग्णालयांची अचानक तपासणी करण्याबाबत या वेळी सूचना करण्यात आल्या.जिल्ह्यात वाढती जनजागृती व कारवाईच्या धास्तीने पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन होण्यास आळा बसत आहे. यामुळे मुलींचा जन्मदर वाढत असून सध्या ८९८वर असलेली मुलींची संख्या ९००च्यावरनेण्याचाप्रयत्नआहे.-डॉ.एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव