(फोटो- १५सीटीआर०१)
ममुराबादहून फुपनगरीकडे जाणाऱ्या रस्त्याची अवजड वाहनांमुळे अशी दुर्दशा झाली आहे. (जितेंद्र पाटील)
ट्रान्सफार्मरमध्ये घाड झाल्याने उपकरणांचे नुकसान
नशिराबाद : येथे विजेचा कमीअधिक होत असलेल्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहे झाले आहेत. त्यातच रविवारी रात्री कुंभारवाडा डीपीत अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने अनेक घरांमधील वीज उपकरणे जळाली असल्याची ओरड नागरिकांनी केली आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह नागरिकांनी केली आहे. कुंभारवाडा जवळील ट्रान्सफार्मरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे तेथून पुरवठा होत असलेल्या कमी-अधिक विजेमुळे अनेकांच्या घरतील टीव्ही, मिक्सर, फ्रीज यासह अनेक वीज उपकरणे जळाली असल्याची ओरड नागरिकांनी केली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक अभियंता पवन वाघुळदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कार्यवाही केली. रात्री उशिरापर्यंत त्या परिसरात वीज गुल होती. वीज उपकरणांचे झालेले नुकसान वीज कंपनीने भरून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.