लोकमत न्यूज नेटवर्कभडगाव : प्लॉटमध्ये पैसे गुंतवणुकीचे आमिष दाखवून तालुक्यातील महिंदळे येथील आशाबाई प्रकाश पाटील (वय ५०) या महिलेस १२ लाख ७० हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याचा १३ जणांविरुद्धचा गुन्हा शनिवारी भडगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यात मैत्रेय कंपनीच्या वर्षा सत्पाळकर यांच्यासोबतच महिंदळे येथील इतर ११ जणांचा समावेश आहे.पोलीस सूत्रांनुसार, याबाबतची फिर्याद आशाबाई प्रकाश पाटील यांनी दिली आहे. त्यांना मैत्रेय कंपनीच्या वर्षा मधुसुदन सत्पाळकर यांच्यासह इतरांनी प्लॉटींगमध्ये पैसे गुंतविण्यास सांगितले. सहा वर्षांनी प्लॉट तुमच्या नावावर करून गुंतवणूक केलेल्या रकमेवर दीडपट रक्कम परत करू, असे आमिष दाखविले. या महिलेचा विश्वास संपादन करून खोटे दस्ताऐवज तयार करून आशाबाई पाटील व साक्षीदारांची फसवणूक करून पैशांचा अपहार केला. ३० जुलै २०१० ते ३० जुलै २०१६ या कालावधीत हा प्रकार घडला.याप्रकरणी १३ जणांविरुद्ध भा.दं.वि. कलम ४२० , ४०६ , ४६५ , ३४, ठेवीदारांचे हितसंबंध अधिनियम ३, ४ व ५ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे करीत आहेत.गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मैत्रेय कंपनीच्या वर्षा मधुसुदन सत्पाळकर, जनार्दन अरविंद परुळेकर दोन्ही रा.विरार, ता.वसई, जि. ठाणे तसेच सुरेश बुधा पाटील, शरद अभिमन पाटील, छायाबाई ज्ञानेश्वर पाटील, देवीदास जब्बारसिंग पाटील, अविनाश लहू पाटील, भास्कर शेनपडू पाटील, उत्तम श्यामराव पाटील, नगीन मिश्रीलाल जैन, सोनजी देवीदास पाटील, लोटन अशोक पाटील, चंद्रकांत पांडुरंग पाटील सर्व रा.महिंदळे, ता.भडगाव यांचा समावेश आहे.
प्लॉटमध्ये गुंतवणुकीचे आमिष १३ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:06 PM
भडगावात ‘मैत्रेय’विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल
ठळक मुद्देमैत्रेय कंपनीत महिंदळे व परिसरातील नागरिकांचे पैसे गुंतले आहेत. त्यांची फसवणुकीची तक्रार प्राप्त झाली असून, ती दाखल करून घेतली आहे. अजूनही अनेक लोकांचे अनेक पैसे यात अडकले असल्याचे समोर येऊ शकते, असे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी सांगितले. गुन्हा दाखल करणाºयांमध्ये मैत्रेय कंपनीच्या वर्षा सत्पाळकर यांच्यासोबतच महिंदळे येथील इतर ११ जणांचा समावेश आहे. खोटे दस्ताऐवज तयार करून झाली फसवणूक