शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जामनेर येथे बालकाच्या गळ््याला चाकू लावून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 6:44 PM

मध्यरात्री चोरट्यांचा थरार

जामनेर : शहरातील चार वेगवेगळ््या ठिकाणी रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन वर्षीय बालकासह महिला व पुरुषांच्या गळ््याला चाकू लावत लूट केली. प्राथमिक अंदाजानुसार या लुटीत सुमारे दोन लाखाचे सोन्या, चांदीचे दागिने व पाच हजाराची रोकड चोरट्यांनी लांबविल्याचा अंदाज आहे. जळगाव येथून आणलेल्या श्वान पथकाकडून दिवसभर चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलीस करीत होते. या घटनेने नवीन वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.रविवारी मध्यरात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान वाकी रस्त्यावरील पाटीलवाडी भागातील रहिवासी व जिल्हा बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी भिमसिंग फत्तेसिंग पाटील यांच्या घराचा दरवाजा चोरट्यांनी तोडून आत प्रवेश केला. पाटील व त्यांच्या पत्नी सविता यांनी चोरट्यांना दरवाज्याबाहेरच रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. घरात घुसलेल्या चौघा चोरट्यांपैकी एकाने भिमसिंग यांच्या गळ्याला चाकू लावत त्यांना मागील खोलीत नेले व दोघांना खाली बसविले. एकाने सविता पाटील यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची पोत, सहा ग्रॅम वजनाचे कानातील झुमके व सहा ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या लांबविल्या. पाटील यांच्या खिशातील रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. घटनेनंतर भयभित झालेल्या पाटील यांनी ही घटना पोलिसांना कळविली.त्यानंतर पहूर रोडवरील श्रीकृष्ण नगरमधील राजू जोशी यांच्या घराकडे वळलेल्या सात ते आठ चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. जोशी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तलवार व बंदूका काढा, असा घरातून जोरात आवाज दिला. जोशी यांचा हा आक्रमकपणा पाहून चोरटे आल्यापावली माघारी परतले. जोशी यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली.वाकी रोडवरील सम्राट अशोक नगरातील बी.एस.निकम यांच्या घरातील मागील दरवाजा तोडून चोरटे आत घुसले. त्यांनी निकम यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळे वजनाची सोन्याची पोत हिसकावली व घरातील काही वस्तू घेऊन पसार झाले. यात नेमके काय काय गेले हे समजू शकले नाही.वाकी रस्त्यावरील शेवटचे टोक असलेल्या धनपुष्प कॉलनीतील पवन नरसिंह सपकाळ यांच्या घरात घुसलेल्या चोरट्यांनी त्यांच्या तीन वर्षे वयाच्या अर्णव या मुलाच्या गळ््याला चाकू लावला. चोरट्यांनी पल्लवी सपकाळे यांच्या गळ््यातील सोन्याची पोत हिसकावून घेतली. अंधारात दिसत नसल्याने चोरटे बॅटरीच्या प्रकाशात मुद्देमाल हिसकावीत होते. सपकाळे यांच्या घरातून चार ग्रॅमची सोन्याची पोत, तीन ग्रॅमचे कानातील कर्णफूल व चार हातातील चांदीच्या मनगट्या लांबविल्या.इतर घरांच्या दरवाजाच्या कड्या बाहेरून लावल्याघटनेची माहिती रात्री पोलिसांना समजताच प्रदीप पोळ, नीलेश घुगे, रमेश कुमावत, ईस्माईल शेख, तुषार पाटील यांनी चोरट्यांच्या शोधार्थ वाकीरोडसह इतर परिसर पिंजून काढला. सोमवारी सकाळी जळगाव येथून आलेल्या श्वान पथकाने एका घरात चोरट्याचा राहिलेला बुट व टोपी सुंगविली. चोरी करणारे हिंदीत बोलत होते. तसेच त्यांनी डोक्यावर टोपी व तोंडाला रुमाल बांधला असल्याचे सांगण्यात आले. धनपुष्प कॉलनीत घुसलेल्या चोरट्यांनी इतर घरांच्या दरवाजाच्या कड्या बाहेरून लावल्याचे सांगण्यात आले.पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील व त्यांच्या सहकार्यांनी संशयितांच्या शोधासाठी गुरु गणेशनगरमध्ये गुजरातेतून कामासाठी आलेल्या आदिवासी वस्तीत श्वान आणले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव