अमळनेर : उत्तरकार्यातील शिळा भात दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने तालुक्यातील २२ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना खेडी व्यवहारदळे येथे १ रोजी घडली. डॉ.जी. एम. पाटील यांनी वेळीच उपचार केल्याने दुसऱ्या दिवशी रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.तालुक्यातील खेडी व्यवहारदळे येथे ३१ ऑक्टोबर रोजी उत्तरकार्याच्या कार्यक्रमाला विविध नातेवाईक आले होते. तेथेजेवणाला भात करण्यात आला होता. भात उरल्यानंतर रात्री देखील तोच भात खाल्ला आणि उरला म्हणून पुन्हा दुसऱ्या दिवशीसकाळी गरम करून खाल्ल्याने भात खाणाऱ्या व्यक्तींना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला. हाच त्रास प्रत्येकाला होऊलागल्याने उत्तरकार्यास आलेले खेडीचे नंदिनी सीताराम ठाकरे, मीराबाई रमेश भिल, शांताराम रमेश भिल , परशुराम रमेश भिल ,तिरोनाबाई राजेश भिल, श्रीराम रमेश ठाकरे, जानकीराम रमेश ठाकरे, रेणुका परशुराम भिल, शिवदास तुकाराम भिल, सीताराम रमेश ठाकरे, तर चौबारी येथील सुरेखाबाई समाधान भिल, साई समाधान भिल, रुबजी नगर येथील पूना तुकाराम भिल ,सुवर्णाबाई तुकाराम भिल, प्रवीण तुकाराम भिल, कोयल तुकाराम भिल, नेहा धनराज भिल ढेकू येथील धनराज उखा भिल, नेहाधनराज भिल यांना एकाचवेळी १ रोजी दुपारी त्रास होऊ लागल्याने ३ वाजेला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. सर्वाना दाखल करून घेत डॉ. जी. एम. पाटील यांनी तातडीने उपचार सुरू केले, वेळेवर आणल्याने २ रोजी त्यांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले.हेडकॉन्स्टेबल भरत ईशी यांनी पंचनामा करून माहिती जाणून घेतली.
शिळा भात खाल्ल्याने २२ जणांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2020 9:49 PM