भुसावळ : चोरीची कार अडवताना चोरट्यांनी वरणगाव येथे पोलिसाला उडवल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना २०१० मध्ये घडली होती़ या प्रकरणी दाखल खटल्यातील संशयीत दोघा आरोपींना अतिरिक्त सत्र न्या़एसक़ेक़ुलकर्णी यांनी दोन खटल्यांमध्ये प्रत्येकी सात व दोन वर्षांची शिक्षा सुनावली़खटल्याची माहिती अशी की, मुंबई येथून चोरलेली चारचाकी जळगावात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नाकाबंदी करण्यात आली होती मात्र चोरट्यांनी नाकाबंदी दरम्यान बॅरीगेटस तोडत सुसाट वाहन भुसावळ, वरणगावमार्गे मलकापूरकडे पळवले होते़ चारही ठिकाणी चोरट्यांनी बॅरीगेटस तोडून पोलिसांच्या अंगावर चारचाकी वाहन नेल्याप्रकरणी चारही पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झाला होता तर वरणगाव येथे पोलीस कर्मचारी दिलीपसिंग आत्माराम चौधरी यांना बॅरीगेटस लावताना चोरट्यांनी उडवल्याने ते गंभीर जखमी झाले होते़भुसावळ तालुका पोलीस ठाण्यासह वरणगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंवि ३०७ व ३५३ अन्वये खटला दाखल करण्यात आला होता़ घटनेनंतर २० जुलै २०१० पासून आरोपी कारागृहात होते़भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या खटल्यात सात साक्षीदार तपासण्यात आले तर वरणगावच्या खटल्यात पाच साक्षीदार तपासण्यात आले़ दोघा बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पहिल्या खटल्यात सात वर्ष शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा तर दुसºया खटल्यात दोन वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सरकारतर्फे अनुक्रमे संजय सोनवणे व अॅड़विजय खडसे यांनी युक्तीवाद केला़ कार चोरीतील संशयीत आरोपी मुंबईचे४संशयीत आरोपी गुरुमुखसिंग कश्मिरसिंग गिरवेल व राहुल नाणकचंद ढाकोलिया (कामठीपुरा, मुंबई) यांनी मुंबई येथून चारचाकी चोरली होती व ते भरधाव वेगाने जळगावकडे येत असताना नाकाबंदी लावण्यात आली मात्र आरोपींनी वाहन सुसाट नेत बॅरीगेटस् तोडले होते़ आरोपींविरुद्ध मलकापूर व जळगाव येथे खटला दाखल केल्यानंतर त्यात त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली होती मात्र मुंबई येथे कार चोरीच्या गुन्ह्यात त्यांना शिक्षा लागली तसेच भुसावळ तालुका व वरणगाव पोलिसात दाखल गुन्ह्यातही त्यांना अनुक्रमे सात वर्ष व दोन वर्ष शिक्षा सुनावण्यात आली़
पोलिसाला उडवले, दोघांना शिक्षा
By admin | Published: January 17, 2017 11:29 PM