ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.24- शहरातील जाममोहल्ला, अमरदीप टॉकीज चौकातील गस्त पोलीस चौकी म्हणून ओळख असलेल्या सुभाष पोलीस चौकीच्या स्लॅबचा काही भाग अचानक रात्री बारा वाजेनंतर कोसळला.
मंगळवारी दुपारी 4 ते 5 या वेळात जोरदार पाऊस झाला त्यामुळे जुन्या आणि जिर्ण पोलीस चौकीच्या स्लॅबचा काही भाग रात्री अचानक कोसळला. सुदैवाने ती रात्री बंद होती. बाहेर कोणीही नव्हते.त्यामुळे जिवितहानी टळली.