जामनेर : शहापूर, ता.जामनेर येथे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी गावठी दारुचे अड्डे उध्वस्त केल्यानंतर काही घरात घुसून चौकशी केली. शनिवारी सकाळी गावातीलच काही महिलांनी आम्ही दारु विकत नाही, तरीही आम्हाला त्रास दिला जातो. शासनाने हाताल काम दिल्यास कुणीही दारु विक्री करणार नाही. त्यामुळे काम द्यावे, अशी मागणी पोलीस ठाण्यात आलेल्या महिलांनी निरीक्षक प्रताप इंगळे यांच्याकडे केली.शहापूर येथे पोलिसांनी हातभट्टी उध्वस्त केल्या. त्यानंतर शनिवारी सकाळी आलेल्या महिलांनी निरपराध लोकांना त्रास दिला जाऊ नये अशी मागणी करीतच शासनाने मजुरांना काम देण्याची मागणी केली. तालुक्यात यंदा दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर हवालदील झाले आहेत. मजुरांना काम मिळत नसल्याने परराज्यात स्थलांतर होत आहे. यावर उपाययोजनांची मागणी केली.
कामासाठी महिला धडकल्या पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:36 PM