धुळे : जुन्या धुळ्यातील जुनी भिलाटी परिसरात मनपातर्फे सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दोन गटात दगडफेक झाली. दगडफेकीत पोलीस निरीक्षक रमेश परदेशी आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांचे बंधू रवींद्र माळी हे जखमी झाले. या घटनेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या घरासमोर शिवीगाळ करण्याचाही प्रकार घडला. घटनेनंतर पोलिसांनी वेळीच जमावावर नियंत्रण मिळविले. मात्र परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. महापालिकेतर्फे जुनी भिलाटी घरकूल योजना राबविण्यात येत आह़े त्यासाठी महापालिकेने मंगळवारी दुपारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली़ दुपारी दोन वाजेनंतर या भागातील नागरिकांनी आपली कैफियत मांडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली़ तेथून परतत असताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या घरावरून जाताना काही जणांनी शिवीगाळ केली़ यावरून वातावरण अधिकच गंभीर झाल़े त्यानंतर दुपारी 5 वाजेच्या सुमारास दोन गट आमने-सामने आल़े दोन्ही बाजूने दगडफेक सुरू झाली़ आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, हिलाल माळी यांचे भाऊ रवींद्र हे जखमी झाल़े. निरीक्षक परदेशी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ तर रवींद्र माळी यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
धुळ्यात दगडफेक पोलीस निरीक्षक जखमी
By admin | Published: February 24, 2016 12:47 AM