चोरटयास अटक : शहर पोलिसांनी केला 21 हजाराचा चोरीचा मुद्देमाल जप्त
धुळे, दि.28- तालुका पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक संभाजी पाटील आपल्या कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था सांभाळत असताना त्याच वेळी त्यांच्या निवासस्थानी चोरटय़ांनी घरफोडी करीत रोख रक्कम व साहित्यावर डल्ला मारला. पोलीस अधिका:याचे घर फोडण्याचे धाडस करीत यंत्रणेला आव्हान देणा:या चोरटय़ाला पोलिसांनी काही तासात अटक करीत त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी रामराव पाटील हे संतोषी माता ते लेनिन चौक रस्त्यावर वनविभागाच्या समोर पोलीस अधिका:यांसाठी असलेल्या शासकीय निवासस्थानांमध्ये राहतात़ पोलीस निरीक्षक पाटील सोमवार 27 रोजी सायंकाळी 5 वाजता त्यांचे शासकीय निवासस्थान बंद करुन धुळे तालुका पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज करण्यासाठी गेले होत़े रात्री 11 वाजेच्या सुमारास ते काम आटोपून आपल्या निवासस्थानी परतले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला़ हॉलच्या पुढे असलेल्या एका खोलीतून चोरटय़ाने 18 हजार 500 रुपये रोख, ब्लँकेटस्, बॅग असा एकूण 21 हजार 200 रुपयांचा ऐवज लांबविला़ पोलीस निरीक्षक पाटील यांनी ताबडतोब शहर पोलीस ठाणे गाठल़े घटनेची फिर्याद दाखल केली़
फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक वसावे यांनी मुन्ना उर्फ इरफान हसन अन्सारी याला अटक केली़ त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून बॅग, ब्लँकेट आणि रोकड असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविल़े पोलिसांनी चोरटय़ाविरुध्द गुन्हा दाखल केला आह़े