माघार घेण्यावरून वाद
याच ठिकाणी अनेक उमेदवारांना शब्द देवूनही माघार घेण्याची वेळ आल्याने तहसील परिसरातच अनेक चांगलाच वाद झाला. आव्हाणे, फुपनगरी, गाढोदा, कठोरा या ग्राम पंचायतीसाठी चांगलीच रस्सीखेच झाली होती. अनेक उमेदवार ऐनवेळी गायब झाल्याने त्या उमेदवारांचा शोध घेवून त्यांना माघारीसाठी अक्षरश पकडून आणावे लागल्याचे चित्र तहसील कार्यालयात पहावयास मिळाले.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कोरोनाचा पार्श्वभूमीवर नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळणे व मास्क लावणे बंधनकारक केले आहे. मात्र, सोमवारी तहसील कार्यालय परिसरात माघारीसाठी झालेल्या गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश फज्जा उडविल्याचे पहायला मिळाले. तसेच गर्दीतील ८० टक्के नागरिकांनी मास्क देखील घातला नव्हता.
बिनविरोध उमेदवारांकडून जल्लोष
अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी माघार घेतल्याने चित्र स्पष्ट झाले. अनेक जागा या बिनविरोध झाल्याने विजयी उमेदवारांनी तहसील कार्यालय परिसरातच जल्लोष साजरा केला. अनेकांनी गुलालाची उधळण केली. तर काही जणांनी एकमेकांना पेढे खावू घालत आनंदोत्सव साजरा केला.